जाहिरात

CCTV Footage: सोनं-चांदी, पैसे अन् सिलिंडरही चोरला! मध्य प्रदेशातील चोरीच्या घटनेची देशभर चर्चा

Madhya Pradesh News: शिवपुरीतील कृष्णपुरम कॉलनीमध्ये नीतू राजावत यांच्या घरातून दागिने आणि गॅस सिलिंडरची चोरी झाली.

CCTV Footage: सोनं-चांदी, पैसे अन् सिलिंडरही चोरला! मध्य प्रदेशातील चोरीच्या घटनेची देशभर चर्चा

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कृष्णपुरम कॉलनी परिसरात एका बंद घरात धाडसी चोरी झाल्याची घटना घडली आहे. नीतू राजावत यांच्या घरात घुसलेल्या चोरट्यांनी केवळ सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कमच चोरली नाही, तर जाताना घरातील एलपीजी गॅस सिलिंडरही सोबत नेला. सध्या बाजारात असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही चोरी विशेष चर्चेत आली आहे.

चोरीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

नीतू राजावत सोमवारी आपल्या माहेरी गेल्या होत्या, मात्र मंगळवारी परतल्यावर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाटातून सोने-चांदीचे दागिने, महत्त्वाची कागदपत्रे आणि रोख रक्कम गायब होती. तसेच स्वयंपाकघरातील भरलेला गॅस सिलिंडरही चोरट्यांनी पळवला होता. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, एक संशयित व्यक्ती गॅस सिलिंडर खांद्यावर ठेवून आरामात चालत जाताना दिसत आहे.

VIDEO

(नक्की वाचा-  ZP Election 2026: संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा; भाजपच्या खेळीनेही धाकधूक वाढली)

भोपाळमध्येही सिलिंडरची चोरी

अशीच एक घटना भोपाळच्या लालघाटी परिसरातही घडली आहे. येथे एका वकिलाच्या घराच्या पार्किंगमधून दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी चक्क चार रिकामे सिलिंडर चोरून नेले. राज्यात एकामागून एक घडणाऱ्या सिलिंडर चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी सरकारचा कडक पवित्रा

मध्य प्रदेशात सध्या 1.76 कोटींहून अधिक एलपीजी ग्राहक आहेत. गॅसच्या वाढत्या मागणीमुळे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गोविंद सिंह राजपूत परिस्थितीवर दररोज लक्ष ठेवून आहेत. बाजार स्थिर करण्यासाठी तेल कंपन्यांनी 1.2 लाख अतिरिक्त सिलिंडर बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. सरकारने 1116 ठिकाणी छापे टाकून 1825 सिलिंडर जप्त केले आहेत आणि अनेक ठिकाणी एफआयआर (FIR) दाखल केले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com