जाहिरात

UP News: मित्रांची मस्ती, तरुणाला नडली! भर मांडवात लग्न मोडलं, नवरीने 7 लाख रुपयेही वसूल केले

नवरीने लग्न करण्यास नकार तर दिलाच सोबतच नवरीने वरपक्षाकडून सात लाख रुपयेही वसूल केले. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..

UP News: मित्रांची मस्ती, तरुणाला नडली! भर मांडवात लग्न मोडलं, नवरीने 7 लाख रुपयेही वसूल केले

उत्तरप्रदेश: मित्रांनी केलेली मस्ती एका तरुणाच्या चांगलीच अंगलट आल्याचा प्रकार उत्तरप्रदेशमध्ये घडला आहे. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये एका तरुणाचे भरमांडवात लग्न मोडले. त्याला नवरीने लग्न करण्यास नकार तर दिलाच सोबतच नवरीने वरपक्षाकडून सात लाख रुपयेही वसूल केले. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हे प्रकरण संभळमधील बहजई येथील कुल्हेटा येथून उघडकीस आले आहे,  शनिवारी 17 मे रोजी खेसारी लाल यांची 19 वर्षीय मुलगी शशी हिच्या लग्नाची मिरवणूक रात्री 9 वाजता आली होती. तिची लग्नाची मिरवणूक अमरोहा येथील आदमपूरच्या तिगरिया नागरी शाह येथून आली होती. दुसरीकड़े नवरदेव अमितच्या लग्नाची मिरवणूक आली.

वराचे मित्र आणि नातेवाईक सर्वजण बँडच्या संगितावर नाचले. पण जेव्हा नवरदेवा आत आला तेव्हा तो अडखळत चालताना दिसला. नवरदेवाची अशी अडखळत एन्ट्री होताच  वधूने त्याच्याकडे पाहून अंदाज लावला की तो दारू पिऊन आहे. कारण अमित दारूच्या नशेत होता. या सर्व प्रकाराने संतापलेल्या नवरीने लग्नास नकार दिला.

(नक्की वाचा-  Pune News : सुनेची आत्महत्या, छळ केल्याचा आरोप; राष्ट्रवादीच्या नेत्यासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल)

जो व्यक्ती त्याच्या लग्नाच्या दिवशीही शुद्धीवर नाही. तो पुढे काय करेल? असा मुलगा काही उपयोगाचा नाही. मी अशा मुलाशी लग्न करू शकत नाही, अशी ठाम भूमिका तिने घेतली. मुलाच्या कुटुंबियांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मुलाने सांगितले की, ती त्याची चूक नव्हती. त्याच्या मित्रांनी कपटाने एका कोल्ड्रिंकमध्ये दारू मिसळली होती आणि त्याला ते प्यायला लावले होते. जेव्हा तो दारूच्या नशेत होता तेव्हा त्याला माहिती मिळाली.  मात्र तरीही नवरीने लग्नास नकार दिला. 

यानंतर दोन्ही पक्ष पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले, जिथे वधूच्या बाजूने लग्नात खर्च झालेल्या पैशांची मागणी केली. नवरी मुलीच्या बाजूच्या लोकांनी वराच्या बाजूने 7 लाख रुपयांची मागणीही केली. त्यांनी सांगितले की,  "लग्नात ७ लाख रुपये खर्च केले होते, जे वराच्या बाजूने द्यावे लागतील. सुरुवातीला मुलाच्या कुटुंबाने पैसे देण्यास नकार दिला. पण नंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. यानंतर मुलाच्या कुटुंबाने मुलीच्या कुटुंबाला पैसे देण्याचे मान्य केले.

Dhule News: अवकाळीचा शिक्षण विभागाला फटका! कार्यालयात पाणीच पाणी, महत्वाच्या फाईल्स भिजल्या

Listen to the latest songs, only on JioSaavn.com