उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली. IPS अधिकारी संजय रस्तोगी यांची 19 वर्षीय मुलगी अनिता रस्तोगी वसतिगृहाच्या खोलीत मृतावस्थेत आढळून आली. अनिता राम मनोहर लोहिया नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी होती. अनिताचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
अनिका तिच्या खोलीत जमिनीवर पडलेली आढळली आणि तिला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. राम मनोहर लोहिया रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रात्री 10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने अनिकाचा मृत्यू झाला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनिका ही एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. संजय रस्तोगी यांची ती मुलगी होती. संजय रस्तोगी हे 1998 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय रस्तोगी सध्या दिल्लीत राष्ट्रीय तपास संस्थेत (NIA) आयजी म्हणून कार्यरत आहेत.
(नक्की वाचा - VIDEO : पाकिस्तान्यांची चिंधीगिरी, लोकांनी उद्धाटनाच्या दिवशीच अर्ध्या तासात लुटला मॉल )
रुग्णालयाने निवेदनात काय म्हटलं?
अनिकाच्या मृत्यूबाबत राम मनोहर लोहिया रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "ही अत्यंत दुःखद बातमी आहे की विद्यार्थिनी अनिका रस्तोगीचे काल रात्री 10 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनिका, तृतीय वर्ष बीए एलएलबीची विद्यार्थिनी होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंब दु:खी आहे आणि आम्ही तिच्या कुटुंबासोबत आहोत.
(नक्की वचा - IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती)
अनिताची खोली आतून बंद होती
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना पंचनामा केला. अनिकाच्या शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वसतिगृहाची खोली आतून बंद होती आणि आत काहीही संशयास्पद आढळले नाही. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असून पीडितेच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world