Bacchu Kadu News : प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू याच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. नागपूर-वर्धा राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन केल्यानंतर साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं. दरम्यान भाजप नेत्यांकडून कडूंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत असल्याचे सांगणाऱ्या बच्चू कडूंनी स्वत:च्या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप भाजप नेते प्रवीण तायडे यांनी केला आहे. (BJP leader Praveen Tayde makes serious allegations against bacchu kadu)
बच्चू कडूंवर गंभीर आरोप
भाजप नेते प्रवीण तायडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे ७२ एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत. या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला आहे. कोटयवधींचा अवैध पैसा या परिसराच्या विकास कामांवर वापरण्यात आला.
गोरगरिबांच्या जमिनी अल्पदरात लाटून बच्चू कडू यांनी अमरावतीच्या परतवाडा-चांदूरबाजार रोडवर पूर्णा नदी काठावर कुरळपूर्णा येथे ७२ एकराच्या जागेवर स्वतःचे निवासस्थान, फार्महाऊस विविध सुखसुविधा असलेल्या वास्तू उभारल्या आहेत. या हवामहालासाठी गोरगरिबांच्या जमिनी जबरदस्तीने बळकावल्याचा गंभीर आरोप प्रवीण तायडे यांनी केला आहे. कोटयवधींचा अवैध पैसा या परिसराच्या विकास कामांवर वापरण्यात आला. बच्चू कडू राज्यमंत्री असताना पदाचा गैरवापर करून त्यांनी या परिसरात शासनाचा निधी वापरला. गुटखा माफिया, लँड माफिया, वाळू माफिया, अवैध व्यवसायमध्ये भागीदारी असलेल्या लोकांकडून खंडणी गोळा करून हा परिसर विकसित करण्यात आल्याचे प्रवीण तायडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
नक्की वाचा - महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ, भाजप आमदाराचा बच्चू कडूंवर लेटरबॉम्ब, मुख्यमंत्र्यांना पत्रात लिहिलं...
हा हवामहाल ताब्यात घेऊन सरकारने सील करावा. बच्चू कडू आणि त्यांच्याशी संबंधित असलेले लोक, संस्था आणि त्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीची देखील चौकशी करण्याची मागणी आमदार प्रवीण तायडे यांनी केली आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी बच्चू कडू आणि त्यांचं फार्म हाऊस नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले आहेत. तायडेंनी बच्चू कडूंच्या फार्म हाऊस आणि निवासस्थानाबद्दल जे गंभीर आरोप केले आहेत त्याची ड्रोन दृश्य देखील समोर आली आहेत.
बच्चू कडूंच्या निवासस्थान परिसरात काय आहे?
* अत्याधुनिक सुख सुविधा असलेलं बच्चू कडूंचे निवासस्थान.
* प्रहार पक्षाचं कार्यालय
* फळबाग असलेली उच्च प्रतीची शेती
* गारमेंट कारखाना
* मिक्सर प्लांट
* स्विमिंग पूल
* शाळा
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
