जाहिरात

Viral Video: विजय यांना जिंकवून मी तमिळनाडूत धोनीपेक्षाही लोकप्रिय होईन, प्रशांत किशोर यांचा VIDEO होतोय VIRAL

Tamil Nadu Election Result 2026: तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये थलापती विजय यांच्या TVK पक्षाने विजयाकडे वाटचाल केली आहे. प्रशांत किशोर यांनी वर्षभरापूर्वीच वर्तवलेली ही भविष्यवाणी कशी खरी ठरली? पाहा सविस्तर बातमी.

Viral Video: विजय यांना जिंकवून मी तमिळनाडूत धोनीपेक्षाही लोकप्रिय होईन, प्रशांत किशोर यांचा VIDEO होतोय VIRAL
"Tamil Nadu Election Result 2026: प्रशांत किशोर यांचा थलापती विजयबाबतचा व्हिडीओ होतोय व्हायरल"
  • तमिळनाडु विधानसभा निवडणुकीत थलापती विजय यांचा पक्ष आघाडीवर
  • प्रशांत किशोर यांनी वर्षापूर्वीच विजयच्या पक्षाच्या विजयाची भविष्यवाणी केली होती, व्हिडीओ होतोय व्हायरल
  • मी TVKला जिंकवण्यास मदत केली तर धोनीपेक्षाही लोकप्रिय होईन, असे प्रशांत किशोर म्हणाले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Tamil Nadu Election Result 2026: तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे 'थलापती' विजय. त्यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाने निवडणुकीच्या मैदानात अनपेक्षित यश मिळवत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. विजय यांना निवडणुकीत मिळालेल्या यशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असल्या, तरी निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराजचे प्रमुख प्रशांत किशोर (PK) यांनी त्यांच्या विजयाची भविष्यवाणी एक वर्ष आधीच केली होती. प्रशांत किशोर यांचा जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  

प्रशांत किशोर यांचा व्हिडीओ व्हायरल

धोनीपेक्षा अधिक लोकप्रिय होईन : प्रशांत किशोर 

तमिळनाडूमध्ये थलापती विजय यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान प्रशांत किशोर यांनी म्हटले होते की, "येथे एमएस धोनीला ओळखणारे खूप आहेत. तो एकमेव बिहारी आहे ज्याची लोकप्रियता तमिळनाडूमध्ये माझ्यापेक्षा जास्त आहे. पण लक्षात ठेवा जेव्हा मी तुम्हाला (TVK) जिंकवण्यास मदत करेन, तेव्हा मी तमिळनाडूत धोनीपेक्षा जास्त लोकप्रिय होईन." प्रशांत किशोर आता 'आयपॅक' (I-PAC) मधून बाहेर पडले असले आणि बिहारमध्ये त्यांनी स्वतंत्र वाटचाल सुरू केली असली तरी थलापती विजय यांच्याबाबतचा त्यांचा अंदाज अचूक ठरला आहे.

(नक्की वाचा: Tamil Nadu: तमिळनाडूत विजय यांची 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री! सत्तासंघर्षात TVK ची जोरदार मुसंडी)

एकदा नव्हे अनेकदा विजय यांच्याबाबत केली होती भविष्यवाणी

प्रशांत किशोर यांनी खूप पूर्वीच ओळखले होते की, थलपती विजय तमिळनाडूच्या राजकारणात किती पुढे जाऊ शकतात. विजय यांचा पक्ष सत्तेच्या शिखरावर पोहोचू शकेल का? असे जेव्हा जेव्हा प्रशांत किशोर यांना विचारले जायचे तेव्हा तेव्हा ते म्हणायचे की, "नक्कीच, जर विजय एकट्याने वाटचाल करत राहिला आणि कठोर परिश्रम केले तर त्याला सत्तेच्या शिखरावर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही." पण जेव्हा जेव्हा प्रशांत किशोर विजयाबाबत भविष्यवाणी करायचे, तेव्हा लोक आश्चर्य व्यक्त करायचे. पण आता तमिळनाडूतील निकाल हे दाखवून देत आहेत की, प्रशांत किशोर यांना भारतीय राजकारणाचे चाणक्य असे उगाच म्हटले जात नाही.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com