जाहिरात

What is GPS spoofing: जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय? पायलट कसा करतात सामना?

What is GPS spoofing: जीपीएस स्पूफिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे. यामध्ये जमिनीवरील सोर्सेसकडून चुकीचे जीपीएस सिग्नल विमानातील नेव्हिगेशन सिस्टीमकडे पाठवले जातात.

What is GPS spoofing: जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय? पायलट कसा करतात सामना?
What is GPS spoofing
  • पिछले सप्ताह दिल्ली में फ्लाइट्स के GPS सिग्नल में फेक अलर्ट आने की घटनाओं पर DGCA सतर्क है.
  • GPS स्पूफिंग में ग्राउंड से भेजे गए गलत सिग्नल के कारण पायलट को विमान की वास्तविक स्थिति का भ्रम होता है.
  • GPS स्पूफिंग एक साइबर अटैक है, जो वॉर जोन में दुश्मन के विमानों को प्रभावित करने के लिए उपयोग होता है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

What is GPS spoofing: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळी एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) सिस्टीममध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे 800 हून अधिक विमानांना विलंब झाला. ज्यामुळे प्रवाशांना तासन् तास विमानतळावर अडकून पडावे लागले. एका बाजूला हा गोंधळ सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला गेल्या आठवड्यापासून दिल्लीच्या आकाशात उड्डाण करणाऱ्या अनेक विमानांच्या GPS सिग्नलमध्ये फेक अलर्ट येण्याच्या घटना समोर आल्या आहेत. या गंभीर समस्येमुळे डीजीसीए सतर्क झाले असून, याला 'जीपीएस स्पूफिंग' म्हटले जाते.

जीपीएस स्पूफिंग म्हणजे काय?

जीपीएस स्पूफिंग हा एक प्रकारचा सायबर हल्ला आहे. यामध्ये जमिनीवरील सोर्सेसकडून चुकीचे जीपीएस सिग्नल विमानातील नेव्हिगेशन सिस्टीमकडे पाठवले जातात. जीपीएस सिस्टीम ज्या फ्रीक्वेन्सीवर काम करत असते, त्याच फ्रीक्वेन्सीवर हे बनावट ट्रान्समिशन केले जाते. यामुळे विमानाला वेगळे संकेत मिळतात.

उदाहरणार्थ, पायलटला वाटते की ते पॉईंट A वर आहेत, पण प्रत्यक्षात ते पॉईंट B वर असू शकतात. या गोंधळामुळे विमानांसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

(नक्की वाचा-  Rapido Rider: "भैया मत करो...", धावत्या बाईकवर महिलेसोबत भयंकर घडलं, VIDEO आला समोर)

पायलट कसा करतात सामना?

कमर्शियल पायलट सुजीत ओझा यांनी सांगितले की, जीपीएस स्पूफिंगची समस्या असली तरी अशा परिस्थितीत विमान कसे हाताळावे, याचे पायलटना प्रशिक्षण दिलेले असते.

पायलट जीपीएसवर पूर्णपणे अवलंबून न राहता INS (Inertial Navigation System) या पर्यायी नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करतात. हे सिस्टीम विमानाचे स्थान निश्चित करण्यासाठी बाहेरून आलेल्या सिग्नल्सवर नव्हे, तर विमानातीलच सेन्सर्सवर अवलंबून असते. मात्र, दिल्लीतील घटनेत याच INS सिस्टीममध्येही मेंटेनन्स सुरू असल्याने, पर्याय म्हणून ती वापरता आली नाही. यामुळे 100 नॉटिकल मैलांपर्यंत फेक अलर्ट आले होते.

(नक्की वाचा- CCTV Footage: दुकानात शिरली, मिरचीपूड फेकली, तरीही प्लॅन फसला; महिला चोराला चांगलीच अद्दल घडली)

वॉर झोनमध्ये होतो वापर

जीपीएस स्पूफिंग हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार असल्याने, याचा वापर विशेषतः वॉर झोनमध्ये शत्रूचे ड्रोन आणि विमाने निकामी करण्यासाठी केला जातो. एका पायलटच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात त्यांना 6 दिवस फ्लाइट उडवताना दरवेळी जीपीएस स्पूफिंगचा त्रास सहन करावा लागला होता. डीजीसीए या गंभीर घटनेची नोंद घेऊन पुढील कार्यवाही करत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com