जाहिरात

व्हायरल व्हिडीओमुळे Youtuber ची डोकेदुखी वाढली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

व्हिडीओ काढून टाकण्यात आला असला तरी वन्य जीव प्रेमी कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.  कुमार यांनी यापूर्वी एकदा 'रानडुकराची करी'ची रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला  होता. 

व्हायरल व्हिडीओमुळे Youtuber ची डोकेदुखी वाढली; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देशभरात हजारो यूट्युबर्स आहेत. वेगवेगळा कंटेंट यूट्युबवर टाकून प्रत्येकाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असतं, प्रसिद्ध व्हायचं असतं. मात्र  काहीतरी वेगळं करण्याच्या नादात काहीजण असं काहीतरी करुन बसतात की त्यांना नको असलेली प्रसिद्धी मिळते. असंच काहीसं तेलंगणातील एका यूट्युबरसोबत घडलं आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

झालं असं की यूट्युबर कोमड प्रणय कुमारने आपल्या चॅनलवर 'मोर करी' बनवण्याच्या रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला होता. या रेसिपीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. कोडम प्रणय देखील खुश होता. मात्र त्यांचा आनंद काही दिवसातच डोकेदुखी बनला. कारण भारतीय कायद्यानुसार मोर बाळगणे किंवा पकडणे बेकायदेशीर आहे. नियम मोडल्यास कडक शिक्षेचीही तरतूद आहे.

(नक्की वाचा-  मनू लाजली, आईनेही नीरजकडे मागितलं वचन; मनू अन् नीरजमध्ये चाललंय काय? Video Viral )

त्यामुळेच पोलीस आणि वनविभागाने या यूट्युबरवर कारवाई केली आहे. वनविभागाने रविवारी प्रणय कुमारला अटक केली आणि त्याने करी बनवलेल्या भागाची पाहणी केली. प्रणयच्या रक्ताचे नमुने आणि उरलेली करी चाचणीसाठी पाठवण्यात आली असून, चाचणीत मोराचे मांस असल्याची खात्री पटल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजन्ना सिरसिल्ला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखिल महाजन यांनी ट्वीट करत म्हटलं की, "संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्यावर आणि अशा कृतीत सहभागी असलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल. 

(नक्की वाचा- 'तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब...' विखे पाटील रोहित पवारांवर भडकले)

व्हिडीओ काढून टाकण्यात आला असला तरी वन्य जीव प्रेमी कुमार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.  कुमार यांनी यापूर्वी एकदा 'रानडुकराची करी'ची रेसिपीचा व्हिडीओ शेअर केला  होता. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com