जाहिरात

Shirdi News: थर्टी फर्स्टच्या जल्लोषसाठी शिर्डी सज्ज! साईमंदिर दर्शनासाठी किती वाजेपर्यंत खुले राहणार?

नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही मोठ्या प्रमाणात भाविक हे शिर्डीत दर्शनाला येत असतात.

Shirdi News: थर्टी फर्स्टच्या जल्लोषसाठी शिर्डी सज्ज! साईमंदिर दर्शनासाठी किती वाजेपर्यंत खुले राहणार?
  • शिर्डी प्रशासनाने नववर्षाच्या स्वागता निमित्त कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे
  • नववर्षाच्या दिवशी साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे
  • शिर्डीतील मुख्य रस्ते नो व्हेईकल झोन करण्यात आले आहेत.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
शिर्डी:

सुनिल दवंगे

सरत्या 2025 वर्षाला निरोप देत आणि येणाऱ्या नव्या 2026 वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डी प्रशासन सज्ज झालं आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षाच्या अखेरीस साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक दाखल होतात. यंदाही शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था उभी केली आहे. 31 डिसेंबरला नववर्षाचं स्वागत केलं जातं. त्याच वेळी अनेक जण नव्या वर्षात सर्वात आधी साईंच्या चरणी लिन होता. काही जण रात्रीपासूनच दर्शनाला येतात. त्यामुळे त्या दिवशी किती वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवायचे असा प्रश्न मंदिर प्रशासना समोर असतो. त्यानुसार प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. 

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील मुख्य रस्ते ‘नो व्हेईकल झोन' करण्यात आलेय. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल साडे चारशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी साईमंदिर 31st डिसेंबरच्या रात्री रात्रभर खुले राहणार ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविक इथं रात्रभर दर्शन घेवू शकतात. या निर्णयामुळे शिर्डीत मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे.

नक्की वाचा - BMC Election: काँग्रेस वंचितचं ठरलं! मुंबई महापालिकेसाठी जागावाटप निश्चित, कोणाच्या वाट्याला किती जागा?

बीडीडीएस, क्यूआरटीसह रॅपीड रिस्पॉन्स फोर्सची पथकं गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. भाविकांची दर्शन रांग थेट रस्त्यावर येत असल्याने मंदिरापासून किमान एक किलोमीटर अंतरावर वाहनतळांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस उपाधिक्षक अमोल भारती यांनी दिली आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही मोठ्या प्रमाणात भाविक हे शिर्डीत दर्शनाला येत असतात. तर काही जण नववर्षाच्या पहिल्याच क्षणाला साईंचं दर्शन कसं मिळेल यासाठी धडपड करत असतात. याची कल्पना शिर्डी साई मंदिर प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आहे. 

नक्की वाचा - PCMC Election: ठाकरे गट शरद पवारांना धक्का देणार? 3 प्लॅन सांगत दिला अल्टिमेटम

त्यामुळेच सुरक्षेची संपूर्ण व्यवस्था शिर्डीत करण्यात आली आहे. 31 डिसेंबरला संपूर्ण रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. साईंचे देशभरच नाही तर संपूर्ण जगात भक्त पसरले आहेत. त्यामुळे ते इथं दर्शनाला निश्चितच येतात. महाराष्ट्रातल्या भक्तांचा ओघ तर शिर्डीत सुरूच असतो. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तर हे प्रमाण जास्त असणार आहे. त्यामुळे प्रशासन सर्व तयारीने सज्ज झाले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com