
Pomegranate Health Benefits: तुमच्या दिवसाची सुरुवात पौष्टिक नाश्त्याने करणे महत्त्वाचे आहे. सकाळी नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करणे ही एक उत्तम सवय आहे. नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. कारण तो रात्रभर उपाशी असलेल्या तुमच्या शरीराला पुन्हा ऊर्जा देण्यास मदत करतो. दैनंदिन कामे करण्यासाठी आवश्यक ऊर्जा तो देतो. फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय फायबर आणि आवश्यक जीवनसत्त्वे (minerals) त्यात असतात. त्यामुळे नाश्त्यासाठी फळं असणं हे कधी ही चांगलं. ते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. डाळिंब त्यासाठी उत्तम म्हणावे लागेल. डाळिंब अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियमने समृद्ध असलेले फळ आहे. चला तर मग, सकाळी रिकाम्या पोटी डाळिंब खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाश्त्यात डाळिंब खाण्याचे फायदे
ऊर्जा (Energy)
डाळिंब हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. जे ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करते. फळातील नैसर्गिक साखर आणि पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स ऊर्जेचा साठा पुन्हा भरण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करतात. सकाळी खाल्ल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटू शकते.
त्वचेसाठी उत्तम (Good for Skin)
डाळिंब अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांचा खजिना आहे. ते त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी चे उच्च प्रमाण त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. तर त्याचे अँटीऑक्सिडंट घटक त्वचेचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करतात.
सुज कमी करणारे गुणधर्म (Anti-inflammatory Properties)
या फळामध्ये शक्तिशाली दाह कमी करणारे गुणधर्म आहेत. जे सूज कमी करण्यास आणि संधिवात (arthritis), गाउट (gout) आणि इतर दाहक रोगांशी संबंधित लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. त्याचे अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल फ्री रॅडिकल्सला निष्क्रिय करून सूज कमी करण्याचे काम करतात.
निरोगी हृदय (Healthy Heart)
हे हृदयासाठी उत्तम फळ आहे. जे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. त्याचे अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल रक्तदाब कमी करण्यास, रक्त लिपिड प्रोफाइल (blood lipid profile) सुधारण्यास आणि प्लेटलेट एकत्रीकरण (platelet aggregation) रोखण्यास मदत करतात.
रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level)
डाळिंबाचा रक्तातील साखरेच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होतो. फळातील अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल इन्सुलिन संवेदनशीलता (insulin sensitivity) सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. डाळिंब मधुमेहाने ग्रस्त व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world