Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळ तसेच प्रत्येक घराघरांमध्ये दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते. बाप्पाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी पंचपक्वान्न तयार केले जातात. पण बाप्पाला मोदक जास्त आवडतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi) आवर्जून तयार केले जातात. पारंपरिक पद्धतीच्या नैवेद्यासोबतच यंदा तुम्ही रोझ फ्लेव्हर उडकीचे मोदकही (Rose Flavoured Modak Recipe) तयार करून पाहा. चला तर झटपट जाणून घेऊया रोझ फ्लेव्हर उकडीच्या मोदकाची रेसिपी....
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024: गणपती बाप्पाची स्थापना का करतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण)
सारणासाठी लागणारी सामग्री
- तूप
- किसलेले ओले खोबरे
- रोझ सीरप
- पिठी साखर
- गुलकंद
उकड तयार करण्यासाठी लागणारी सामग्री
- पाणी
- मीठ
- रोझ सीरप
- तांदळाचे पीठ
सारण तयार करण्याची कृती
- एका कढईमध्ये तूप वितळवून घ्या.
- तुपामध्ये किसलेले खोबरे परतवून घ्या.
- खोबरे परतवून झाले की त्यामध्ये रोझ सीरप मिक्स करावे.
- त्यानंतर पिठी साखर आणि गुलकंद मिक्स करावा.
- सारणातील सर्व सामग्री नीट एकजीव करून घ्या.
- सारण तयार झाल्यानंतर गॅस बंद करा आणि सारण थंड होऊ द्यावे.
(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला मोदकांचाच नैवेद्य का अर्पण करतात?)
उकड कशी तयार करावी?
- उकड तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवा.
- पाण्यामध्ये चवीपुरते मीठ मिक्स करावे.
- रोझ सीरपही मिक्स करा.
- सर्वात शेवटी तांदळाचे पीठ मिक्स करा.
- एका ताटामध्ये पीठ काढून घ्या आणि उकड गरम असतानाच व्यवस्थित मळा.
- पिठाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करा आणि बोटांच्या मदतीने पारी तयार करा.
- हाताने जमत नसल्यास तुम्ही पोळपाट लाटण्याचाही वापर करू शकता.
- चमचाभर सारण भरून पारीला कळ्या पाडा आणि मोदक तयार करा.
- मोदक पात्रामध्ये केळीच्या पानावर मोदक ठेवा आणि वाफवून घ्या.
- मोदक तयार झाल्यानंतर बाप्पाला नैवेद्य अर्पण करा.
Video Credit - Insta @redsoilstories
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world