Ganpati Visarjan News : आज पहाटेपर्यंत मुंबई आणि पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. सकाळी 9 वाजेनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. गेल्या दहा दिवसांपासून गणेशाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज त्याला निरोप देताना गणेशभक्तांचे डोळे पाणावले होते. दुसरीकडे आज चंद्रग्रहण असल्याने त्यानिमित्ताने राज्यातील अनेक मंदिरांमधील दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे.
Live Update : सिध्दीविनायक मंदिराचे दरवाजे खग्रास चंद्रग्रहणामुळे बंद
सिध्दीविनायक मंदिराचे दरवाजे खग्रास चंद्रग्रहणामुळे बंद
ग्रहणाचा पर्वकाळात ३ तास ३० मिनिटे
रात्री ९:३० वा नंतर सिध्दीविनायक गाभाऱ्यातून फुले व नारळ वाहणे बंद
संध्याकाळी ५.१५ पासुन ग्रहणाचे वेध पाळले जाणार
Live Update : लालबागच्या राजाचे विसर्जन आणखी लांबले…
लालबागच्या राजाचे विसर्जन आणखी लांबले… समुद्राची भरती आणखी ओसरली की पुन्हा एकदा विसर्जनाची तयारी करण्यात येणार आहे. समुद्राची भरती आणि लाटा यामुळे विसर्जनाला अडथळे निर्माण होत आहे
Live Update : रविवारचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार
रविवारचे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार
रविवारी 7 सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री होणारे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले
रविवार 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री 11 ते 12.23 दरम्यान संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत आल्याने खग्रास स्थितीचे दर्शन होईल. खग्रास स्थितीमध्ये पौर्णिमेचे संपूर्ण चंद्रबिंब लालसर, तपकिरी रंगाचे दिसेल रात्री 12.23 वाजता चंद्रग्रहण सुटण्यास प्रारंभ होईल. उत्तररात्री 1 वाजून 27 मिनिटांनी चंद्रग्रहण पूर्णपणे सुटेल है खग्रास चंद्रग्रहण सर्वांना साध्या डोळ्यांनी पाहता येईल.
हे खग्रास चंद्रग्रहण भारताप्रमाणेच संपूर्ण आशिया, आफ्रिका, यूरोप, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथूनही दिसेल.
यापुढील चंद्रग्रहण मंगळवार 3 मार्च 2026 रोजी होईल, असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले...
Live Update : पुणे पोलीस गणपती मंडळांपुढे हतबल, अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी उडवले फटाके
पुणे पोलीस गणपती मंडळांपुढे हतबल, अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी उडवले फटाके
नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली
एकजण ताब्यात पोलिसांच्या समोरच वाजविले चौकात फटाके
Live Update : लालबागच्या राजाची पुन्हा एकदा विसर्जनाची तयारी सुरू
लालबागच्या राजाची पुन्हा एकदा विसर्जनाची तयारी सुरू…
समुद्राला आलेल्या भरतीचे पाणी आता ओसरू लागले आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरच अडकलेली लालबागच्या राजाची मूर्ती आता पुन्हा एकदा तराफ्यावर आणण्याची प्रक्रिया सुरू…
Live Update : अनंत चतुर्थीनिमित्त ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 5623 गणेश मूर्तींचे विसर्जन...
अनंत चतुर्थीनिमित्त ठाणे महानगरपालिका हद्दीत एकूण 5623 गणेश मूर्तींचे विसर्जन...
सर्वाधिक घरगुती गणेश मूर्ती दिवा विसर्जन घाट येथे करण्यात आल्या यामध्ये 561 मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले..
तर सर्वाधिक सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन पारसिक रेतीबंदर खाडीमध्ये करण्यात आले यात तब्बल 220 मुर्त्या विसर्जित करण्यात आल्या..
पारसीक रेतीबंदर खाडीमध्ये ठाणे शहरासोबतच इतरत्र शहरातील देखील सार्वजनिक लहान मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले..
Live Update : मच्छी बाजारात प्रचंड गर्दी, गणेशोत्सव पार पडल्या नंतर मत्स्य खवय्यांची मासे बाजारात गर्दी
श्रावण आणि गणेशोत्सव यामुळे ओस पडलेले मच्छी बाजार आज पुन्हा गजबजले आहेत. गेल्या काही दिवसात मासे बाजारात मत्स्य खवयांची पाठ होती.मात्र गणपती विसर्जन झाल्यानंतर आज मासे बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. माशांचे दरही त्यामुळे वधारले होते पापलेट सोळाशे रुपये किलो, सुरमई तेराराशे रुपये, किलो तर बांगडे तीनशे ते चारशे रुपये किलो अशा दराने विकले गेले. माशांचे दर वाढलेले असूनही असे खवय्याने ते खरेदी केल्याचे पाहायला मिळत होते
Live Update : गेल्या 24 तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच
गेल्या 24 तासांपासून पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका सुरूच
अलका टॉकीज चौकात भाविकांची गर्दी
डीजेने अलका चौक दणाणला
आतापर्यंत १२० मंडळ अलका चौकातून विसर्जनाला गेले..
कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड वरून अजून ही मंडळ सुरू
विसर्जन मिरवणूक सुरू होऊन झाले २४ तास
अनेक मंडळांचे विसर्जन अजून बाकी
यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला विलंब होण्याची शक्यता
काल बरोबर ९.३० वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक झाली होती सुरू
Live Update : कोकणवासी परतीच्या प्रवासाला, मात्र कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने नाराजीचा सूर
गणेशोत्सवात कोकणात आलेले चाकरमानी सध्या परतीच्या प्रवासाला लागले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त चाकरमनी दाखल झाले होते. काल अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन केल्यानंतर आज मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मात्र कोकण रेल्वेची कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे....तर एजंट कडून चढ्याभावाने म्हणजे तब्बल दोन ते अडीच हजार रुपयांनी तिकीट विकत घ्यावा लागत असल्याने नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे.
Live Update : लालबागचा राजा तराफ्यावर चढवण्यास अडचण, बाप्पाच्या विसर्जनाचा वेळ वाढला
लालबागचा राजा तराफ्यावर चढवण्यास अडचण, बाप्पाच्या विसर्जनाचा वेळ वाढला
सर्वसाधारणपणे ९.३० पर्यंत लालबागचा राजा तराफ्यावर चढून विसर्गनासाठी पुढे सरकतो. मात्र अद्यापही लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढलेली नाही. सध्या भरतीचा काळ असल्याने मूर्ती तराफ्यावर चढविण्यास अनेक अडचणी येत असल्याचं सांगितलं जात आहे.
Live Update : गणेशोत्सव काळात कोल्हापुरातील इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडून डॉल्बी आणि ड्रग्स विरोधात जनजागृती मोहीम
गणेशोत्सव काळात कोल्हापुरातीलया इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडून डॉल्बी आणि ड्रग्स विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच गावांनी मिळून पूर्णपणे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केला. खेबवडे, मौजे नंदगाव, वड्डवाडी, जैताळ या गावांनी यावर्षीपासून प्रदूषणमुक्त असे सण साजरे करण्यावर भर दिला. तसेच शाळकरी मुलांना पोलीस ठाण्यात ड्रग्स आणि प्रदूषण यावर मार्गदर्शनही केलं. पोलीस निरीक्षक शेख यांनी मंडळाना विश्वासात घेऊन सामाजिक उपक्रमबाबत जागृती केली. त्यामुळे यंदा या इस्पुर्ली पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये अनोखा गणेशोत्सव साजरा झाल्याचे पाहायला मिळाले.
Live Update : 24 तास उलटून गेले तरीही पुण्यात विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू
पुण्यात अद्यापही विसर्जन मिरवणूक सुरूच
विसर्जन मिरवणूक सुरू होऊन झाले २४ तास
अनेक मंडळांचे विसर्जन अजून बाकी
यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला विलंब होण्याची शक्यता
काल बरोबर ९.३० वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक झाली होती सुरू
Live Update : दिवाळी आणि छटपूजेनिमित्त भुसावळ मार्गे 14 विशेष रेल्वे धावणार!
दिवाळी आणि छटपूजेनिमित्त भुसावळ मार्गे 14 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार असून 14 सप्टेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. या विशेष गाड्यांमध्ये कोल्हापूर - कटिहार, पुणे - गाजीपुर, पुणे - सांतारागाच्छी , पुणे - दानापूर व पुणे - अमरावती गाड्यांचा समावेश असून सणासुदीच्या काळात गाड्यांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती भुसावळ रेल्वे मंडळाने दिली आहे.