ॲव्होकॅडो फळ खाण्याचे गुणकारी फायदे!

जाहिरात
Read Time: 2 mins
ॲव्होकॅडो फळ खाण्याचे गुणकारी फायदे!
मुंबई:

फळं ही आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहेत. फळांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. विशेषतः, धावपळीच्या जीवनात, ते आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी कार्य करू शकतात. ॲव्होकॅडोही असच फळ आहे. ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. ॲव्होकॅडोचे गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्याबरोबरच अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतात. चला जाणून घेऊया ॲव्होकॅडो खाण्याचे फायदे.

ॲव्होकॅडो रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लाभदायक!

  • ॲव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड (MUFA)आहेत, जे कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यास मदत करतात. 
  • ॲव्होकॅडो वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. 
  • यामध्ये असलेले हेल्दी फॅट वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
  • ॲव्होकॅडो लिपिड प्रोफाइल सुधारण्यास मदत करते.
  • यामध्ये असलेले उच्च पोटॅशियम घटक रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. 
  • ॲव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम व फोलेट यासह विविध आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे जे संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर मानले जातात.
  • ॲव्होकॅडो टोस्टमधील तंतुमय पदार्थामुळे आतड्यांचे आरोग्यही सुधारते.

मधुमेहावरही प्रभावी!

  • ॲव्होकॅडो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. 
  • आहारात ॲव्होकॅडोचा समावेश केल्यास इन्सुलिन आणि ग्लुकोजची होणारी वाढ रोखता येते. 
  • ॲव्होकॅडोचे नियमित सेवन वृद्धापकाळात स्मरणशक्ती वाढवते.
  • ॲव्होकॅडोमध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत. 
  • ॲव्होकॅडोचे सेवन केल्याने मॅक्युलर रंगद्रव्य वाढते.

Disclaimer : लेखाद्वारे केवळ सामान्य माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.