जाहिरात

Liver Health: फक्त दारूच नव्हे तर अपुऱ्या झोपेसह 7 वाईट सवयी तुमच्या लिव्हरसाठी घातक, आजच करा हे बदल अन्यथा...

Liver Health: तुमच्या सात सवयी लिव्हरच्या आरोग्यासाठी घातक ठरतायेत.

Liver Health: फक्त दारूच नव्हे तर अपुऱ्या झोपेसह 7 वाईट सवयी तुमच्या लिव्हरसाठी घातक, आजच करा हे बदल अन्यथा...
"Liver Health Tips: तुमच्या लिव्हरचं आरोग्य धोक्यात आहे, कारण आहे या सात सवयी"
Canva

Liver Health: लिव्हर खराब होण्यामागील कारणांबाबत चर्चा केली जाते, त्यावेळेस सर्वप्रथम मद्यपानाची सवयच कारणीभूत असल्याचा विचार डोक्यात येतो. पण दैनंदिन जीवनातील कित्येक सवयींमुळे लिव्हरच्या आरोग्यास हानी पोहोचते, हे तुम्हाला माहितीये का? खराब आहार आणि झोपेची कमतरता यासारख्या छोट्या गोष्टी देखील लिव्हरसाठी हानिकारक ठरू शकतात. याबाबत एनडीटीव्हीने प्रसिद्ध डॉक्टर एसके सरीन यांच्याशी बातचित केलीय, जाणून घेऊया त्यांनी लिव्हरसाठी धोकादायक ठरणाऱ्या कोणत्या सात सवयींची माहिती दिलीय.  

डॉक्टर एसके सरीन यांच्या मते सात सवयी लिव्हरसाठी धोकादायक|  7 Lifestyle Habits That Can Damage Your Liver

1. पेनकिलर्सचा अतिरेक (Painkillers)

छोट्या-छोट्या दुखण्यातून बरं वाटावं म्हणून वारंवार पेनकिलर्सचा आधार घेणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच औषधांचे सेवन करणं लिव्हरसाठी विषसमान ठरू शकते. जास्त प्रमाणात औषधांचे सेवन केल्यास लिव्हरच्या पेशींवर वाईट परिणाम होऊ शकतो. 

2. जास्त प्रमाणात फॅटी फुड्सचं सेवन 

जास्त प्रमाणात तळलेले, तेलकट आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन केलं तर लिव्हरवर ताण येतो. यामुळे लिव्हरमध्ये जास्त प्रमाणात फॅट्स जमा होतात, परिणामी फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते.  

3. अपुरी झोप

पुरेशा प्रमाण झोप न घेतल्यास लिव्हरची झालेली झिज भरून काढण्याची प्रक्रिया आणि शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते. लिव्हर नैसर्गिकरित्या डिटॉक्स होण्यासाठी योग्य वेळेत झोपणे आणि झोपेतून उठणे आवश्यक आहे.  

4. वेळीअवेळी खाणेपिणे 

वेळीअवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीराची चयापचयाची गती मंदावते. यामुळे लिव्हरच्या एंजाइम्सच्या (Enzymes) कामात अडथळे निर्माण होतात आणि शरीरामध्ये फॅट्सचे पचन योग्य पद्धतीने होत नाही.

5. कमी प्रमाणात पाणी पिणे 

पाणी आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम करतं. दिवसभरात तुम्ही पुरेशा प्रमाणात पाणी प्यायले नाही तर लिव्हरची शरीर डिटॉक्स करण्याची क्षमता धीमी होईल. 

Ginger Oil For Foot Massage: आल्याच्या तेलाने पायांचा मसाज केल्यास काय होते? कसा करावा उपाय

(नक्की वाचा: Ginger Oil For Foot Massage: आल्याच्या तेलाने पायांचा मसाज केल्यास काय होते? कसा करावा उपाय)

6. जास्त प्रमाणात साखरयुक्त पदार्थांचे सेवन  

जास्त प्रमाणात साखर किंवा सोडा आणि शीत पेय पिण्याची सवय लिव्हरसाठी विषसमान आहे. जास्त प्रमाणात साखरयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास लिव्हरमध्ये अतिरिक्त फॅट्स जमा होऊ शकतात, यामुळे लिव्हरला सूज येऊ शकते.

Depression Symptoms: एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, हे कसं ओळखायचं? डिप्रेशनमुळे कोणते दुष्परिणाम होतात?

(नक्की वाचा: Depression Symptoms: एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, हे कसं ओळखायचं? डिप्रेशनमुळे कोणते दुष्परिणाम होतात?)

7. खराब लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याची सवय 

एकूणच खराब लाइफस्टाइल ज्यामध्ये व्यायाम आणि पोषक आहाराचाही अभाव असल्यास लिव्हरचे हळूहळू नुकसान होऊ शकते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com