जाहिरात

Ginger Oil For Foot Massage: आल्याच्या तेलाने पायांचा मसाज केल्यास काय होते? कसा करावा उपाय

Ginger Oil For Foot Massage: आयुर्वेदानुसार पायांच्या भागामध्ये कित्येक महत्त्वपूर्ण नसा असतात, ज्या थेट डोळ्यांशी जोडलेल्या असतात. यामुळे पायांचा मसाज केल्यास डोळ्यांवरील ताण दूर होण्यास मदत मिळू शकते.

Ginger Oil For Foot Massage: आल्याच्या तेलाने पायांचा मसाज केल्यास काय होते? कसा करावा उपाय
"Ginger Oil For Foot Massage: आल्याच्या तेलाने पायांचा मसाज कसा करावा?"
Canva

Ginger Oil For Foot Massage: डिजिटलच्या युगात बहुतांश काम कम्प्युटर किंवा मोबाइलच्या मदतीनंच करणे आता दिनचर्येचा भाग झालंय.  तास-न्-तास स्क्रीन पाहून काम केल्याने डोळ्यांवर ताण येऊन थकवा जाणवणे आणि डोळे कमकुवत होण्याची समस्या निर्माण होते. तुम्ही देखील या समस्येचा सामना करत असाल या लेखातील माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी रामबाण उपाय जाणून घेऊया... 

डोळ्यांचा थकवा कसा दूर करावा?

डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी आल्याच्या तेलाचा वापर करावा. आयुष मंत्रालयाच्या माहितीनुसार, आल्याच्या तेलाने पायांचा नियमित मसाज केल्यास दृष्टी सुधारण्यास मदत मिळेल आणि कित्येक आजारांचा धोका दूर होईल. आयुर्वेदानुसार पायांमध्ये कित्येक महत्त्वपूर्ण नसा असतात, ज्या थेट डोळ्यांशी जोडलेल्या असतात. पायांचा मसाज केल्यास डोळ्यांवरील ताण दूर होण्यास मदत मिळेल. दृष्टी सुधारेल आणि डोळ्यांचा कोरडेपणाही कमी होईल. 

आल्याच्या तेलाने पायांचा मसाज करण्याचे फायदे

  • आल्याच्या तेलाची प्रकृती उष्ण असते, ज्यामुळे रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते आणि वात दोष संतुलित होण्यास मदत मिळते. 
  • डोळ्यांपर्यंत पोषणतत्त्वांचा पुरवठा होऊन थकवा दूर होतो.
  • रात्री झोपण्यापूर्वी पायांचा मसाज करावा, यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होऊन झोपही चांगली येईल. 
  • मानसिक-शारीरिक तणाव कमी होईल, पायांवरील सूज आणि वेदनाही कमी होतील.
  • आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे पायांवरील सूज कमी होऊन रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल. 

How To Calm Your Mind: मन सतत धावतंय, शांत होत नाहीय? करा हे 8 सोपे उपाय

(नक्की वाचा: How To Calm Your Mind: मन सतत धावतंय, शांत होत नाहीय? करा हे 8 सोपे उपाय)

पायांचा मसाज कसा करावा?
  • आल्याचं शुद्ध तेल किंवा तिळाच्या तेलामध्ये आले मिक्स करून ते गरम करा.
  • तेल कोमट झालं की तळवे, टाचा आणि बोटाचा 10-15 मिनिटांसाठी मसाज करा. 
  • मसाज केल्यानंतर गरम पाण्याने पाय स्वच्छ धुऊन घ्या आणि मोजे घालावे.

Knuckle Cracking: बोट मोडण्याची सवय आहे का? बोट मोडल्याने काय होतं? जाणून घ्या संशोधनातील माहिती

(नक्की वाचा:Knuckle Cracking: बोट मोडण्याची सवय आहे का? बोट मोडल्याने काय होतं? जाणून घ्या संशोधनातील माहिती)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com