जाहिरात

Uric Acid Control Roti: युरिक अ‍ॅसिड नसांमधून बाहेर खेचून काढेल या पिठाची भाकरी, या लोकांनी नक्की करावे सेवन

Uric Acid Control Roti: शरीरामध्ये वाढलेल्या युरिक अ‍ॅसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहात का? समस्येतून सुटका मिळवण्यासाठी उपाय शोधताय का? तर डाएटमध्ये या पिठाच्या पोळीचा समावेश नक्की करा.

Uric Acid Control Roti: युरिक अ‍ॅसिड नसांमधून बाहेर खेचून काढेल या पिठाची भाकरी, या लोकांनी नक्की करावे सेवन
High Uric Acid: युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी उपाय

Uric Acid Control Roti: अयोग्य जीवनशैलीमुळे हल्ली बहुतांश लोक युरिक अ‍ॅसिडच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. युरिक अ‍ॅसिड ही एक टाकाऊ गोष्ट आहे, जे तुमच्या शरीरातील अन्न आणि पेयातील प्युरिन नावाच्या रसायनांच्या विघटनानंतर तयार होते. शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढण्यामागील कारणे अनेक असू शकतात. ज्यामध्ये जीवनशैली, पौष्टिक आहाराचा अभाव, मद्यपान किंवा अन्य आरोग्याशी संबंधित समस्यांचा समावेश असू शकतो. योग्य वेळीच या समस्येवर औषधोपचार केले नाही तर समस्या अधिक वाढू शकतात. युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय शोधत असाल तर रोजच्या पोळीऐवजी डाएटमध्ये बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा. 

बाजरीतील पोषणतत्त्वांची माहिती

बाजरी हे एक भरड धान्य आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. बाजरीमध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, थायामिन, रायबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, लोह, झिंक आणि फॉस्फरस यासारख्या गुणधर्मांचा समावेश आहे; जे आरोग्यासाठी पोषक मानले जातात. बाजारीचा तुम्ही आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे समावेश करू शकता. भाकरी तसेच खिचडी देखील तयार करू शकता.

युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात आणण्यासाठी उपाय (Bajra Roti To Reduce Uric Acid)

बाजरीची भाकरी खाल्ल्यास युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. बाजरीमध्ये फायबरसह अन्य पोषकघटकांचा समावेश आहे, ज्यामुळे शरीरातील युरिक अ‍ॅसिड बाहेर फेकले जाण्यास मदत मिळू शकते. 
 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Canva

बाजरीची भाकरी खाण्याचे फायदे (Bajra Ki Roti Khane Ke Fayde)

बाजरीची भाकरी खाल्ल्यास युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेलच शिवाय सांधेदुखीची समस्या कमी होण्यास आणि पचनप्रक्रियेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. तसेच हाडांचे आरोग्यही निरोगी राहील. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com