Triphala Benefits: त्रिफळ चूर्णाचे सेवन केल्यास आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळते. हिरडा, बेहडा आणि आवळा या तीन गोष्टींपासून त्रिफळ चूर्ण तयार केले जाते. त्रिफळ चूर्ण खाल्ल्यास वात, पित्त आणि कफ हे शरीरातील तीन दोष संतुलित राहण्यास मदत मिळेल. त्रिफळ चूर्ण दुधामध्ये मिक्स करुन प्यायल्यास शरीराला असंख्य फायदे मिळतील तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित समस्याही सुटतील.
त्रिफळ चूर्णमध्ये अँटी-बायोटिक, अँटी-इन्फ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सह कित्येक गुणधर्मांचा साठा आहे. यामुळे पचनशक्ती सुधारते, वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते, शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते, केस आणि चेहऱ्यावरील चमक वाढते, मानसिक ताण कमी होण्यास मदत मिळते.
त्रिफळ चूर्णाचे कसे करावे सेवन?
पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळ चूर्ण दुधामध्ये मिक्स करुन पिणे आरोग्यासाठी वरदान ठरू शकते, यामुळे पचनशक्ती सुधारेल. बद्धकोष्ठता, गॅस किंवा पोटदुखी यासारख्या समस्या निर्माण होत असल्यास त्रिफळ चूर्ण दुधामध्ये मिक्स करुन प्यावे. यामुळे आतड्या आतील बाजूने स्वच्छ होतील.
चांगली झोप मिळेल
झोपेशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास दुधामध्ये त्रिफळ चूर्ण मिक्स करुन पिणे फायदेशीर ठरेल. या पेयामुळे गाढ आणि शांत झोप येण्यास मदत मिळेल.
त्वचा
त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी त्रिफळ चूर्ण खाणे फायदेशीर ठरेल, यामध्ये अँटी-एजिंग गुणधर्माचा समावेश आहे. त्रिफळ चूर्ण दुधामध्ये मिक्स करुन प्यायल्यास रक्त शुद्ध होऊन चेहऱ्यावर ग्लो येईल. चेहऱ्यावरील डागांची समस्याही कमी होईल.
(नक्की वाचा: Coriander Seeds Water Benefits: रिकाम्या पोटी धण्याचे पाणी पिण्याचे 4 मोठे फायदे, कसे तयार करावे पाणी?)
हाडे मजबूत होतील
हाडे आणि स्नायूपेशी मजबूत होण्यासाठी त्रिफळ चूर्ण दुधामध्ये मिक्स करुन प्यावे. याद्वारे शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरुन निघण्यास मदत मिळेल.
नक्की वाचा: Weight Loss Tips: स्लिम आणि फिट दिसायचंय? 8 एक्सरसाइज केल्यास वजन झटकन होईल कमी
त्रिफळ चूर्णाची सेवन करण्याची योग्य पद्धत
- रात्रीच्या वेळेस त्रिफळ चूर्ण सेवन करणे फायदेशीर ठरेल.
- ग्लासभर दुधामध्ये एक चमचा त्रिफळ चूर्ण मिक्स करा.
- झोपण्यापूर्वी त्रिफळ चूर्णयुक्त दूध प्यावे.
- याद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाण्यास मदत मिळते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

