जाहिरात

Health News: सुंदर त्वचा, घनदाट केस आणि वेटलॉसाठी एकच रामबाण उपाय, छोट्याशा गोष्टीचे असंख्य फायदे

Health News: एकाच उपाय केल्यास तुम्हाला त्वचा, केस आणि वेटलॉसच्या समस्येतून सुटका मिळेल; जाणून घ्या सविस्तर माहिती..

Health News: सुंदर त्वचा, घनदाट केस आणि वेटलॉसाठी एकच रामबाण उपाय, छोट्याशा गोष्टीचे असंख्य फायदे
"Health News: डाएटमध्ये लसूण आणि मधाचा समावेश केल्यास काय होईल?"
Sai Tamhankar Insta

Health News: एकाच उपायाच्या मदतीने तुम्हाला त्वचा, केस तसेच वजनाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळाली तर? हो, हे शक्य आहे. छोटासा घरगुती उपाय केल्यास तुम्हाला या तीनही समस्यांमधून सुटका मिळेल. बदलत्या काळानुसार लोक आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत. फिटनेसचा एक भाग म्हणून लोक डाएटमध्ये लसणाचा समावेश करू लागले आहेत. मधामध्ये लसूण बुडवून खाल्ल्यास कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊया...  

मधामध्ये लसूण बुडवून खाल्ल्यास काय होते?

रोगप्रतिकारकशक्ती आणि ऊर्जेसाठी वरदान (Garlic Honey Benefits)

लसणातील अँटी-बॅक्टेरिअरल आणि अँटी-व्हायरल गुणधर्मामुळे शरीराला संसर्गाविरोधात लढण्यास मदत मिळते. मधातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. नियमित मध-लसणाचे सेवन केल्यास दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहील. 

त्वचा आणि केसांसाठी नैसर्गिक टॉनिक  

मध आणि लसणामुळे तुमचे शरीर आतील बाजूनंही निरोगी राहते शिवाय त्वचेवर नैसर्गिक तेज येते, त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. मधातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील चमक वाढते आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. लसणातील प्रोटीन आणि खनिजांमुळे केस मजबूत तसेच घनदाट होण्यास मदत मिळते. 

वजन घटण्यास आणि पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळेल (Weight Loss Tips) 

मधातील लसूण रिकाम्या पोटी खाल्ल्यास शरीराची चयापचयाची गती जलद होईल आणि शरीराचे अतिरिक्त फॅट्स घटण्यास मदत मिळेल. पचनप्रक्रिया सुधारेल, पोटावरील सूज कमी होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

सर्दी-खोकला आणि हृदयासाठी लाभदायक 

मध आणि लसणामध्ये नैसर्गिक अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, यामुळे घशातील खवखव, खोकला, सर्दी यासारख्या समस्यांपासून सुटका मिळेल. कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळते, परिणामी हृदयाचे आरोग्य निरोगी राहील. 

Weight Loss Tips: स्लिम आणि फिट दिसायचंय? 8 एक्सरसाइज केल्यास वजन झटकन होईल कमी

(नक्की वाचा: Weight Loss Tips: स्लिम आणि फिट दिसायचंय? 8 एक्सरसाइज केल्यास वजन झटकन होईल कमी)

लसूण-मधाचे सेवन कसे करावे? (Benefits of Eating Garlic With Honey)
  • दोन ते तीन लसूण सोलून मधामध्ये रात्रभर भिजत ठेवा. 
  • सकाळी रिकाम्या पोटी एक-एक लसूण खावे आणि कोमट पाणी प्यावे.  
  • अ‍ॅलर्जी किंवा पोटाच्या समस्या असतील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com