जाहिरात

Weight Loss Tips: स्लिम आणि फिट दिसायचंय? 8 एक्सरसाइज केल्यास वजन झटकन होईल कमी

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी आठ एक्सरसाइज केल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात.

Weight Loss Tips: स्लिम आणि फिट दिसायचंय? 8 एक्सरसाइज केल्यास वजन झटकन होईल कमी
"Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा 8 व्यायाम"

Weight Loss Tips: केवळ डाएट फॉलो करुन वजन कमी होणार नाही तर यासाठी नियमित व्यायाम देखील करावा लागेल. तुम्ही देखील वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करताय, पण जिममध्ये जाणं तुम्हाला शक्य नाहीय? चिंता करू नका. घरच्या घरी तुम्ही काही सोपे एक्सरसाइज करुन वेटलॉस करू शकता. आठ सोपे व्यायाम नियमित केल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास नक्कीच मदत मिळेल. 

वजन कमी करण्यासाठी 8 जबरदस्त व्यायाम | 8 Weight Loss Exercises 

1. जम्पिंग जॅक (Jumping Jack)

वॉर्मअप करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज करणे शरीरासाठी फायद्याचे ठरेल. यामुळे हार्ट रेट वाढेल, रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल आणि संपूर्ण शरीराच्या क्रिया सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे वर्कआउटची सुरुवात जम्पिंग जॅकने करू शकता. 

2. बर्पीज् (Burpee)

बर्पीज् एक पावरफुल व्यायाम आहे, जो एकाच वेळेस असंख्य स्नायूंवर काम करतो. या प्रकारामध्ये स्क्वॅट्स, पुश-अप आणि जम्प असे कॉम्बिनेशन असते. 10 ते 15 मिनिटे बर्पीज केल्यास कॅलरीज् जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळेल आणि शारीरिक क्षमताही वाढेल.  

3. हाय नीज् (High Knees)

एकाच ठिकाणी उभे राहून पाय गुडघ्यांपासून वर-खाली करण्याच्या व्यायामास हाय नीज् असे म्हणतात. पोट आणि पायांवरील चरबी कमी करण्यास मदत मिळते. हृदयाच्या आरोग्यासाठीही हा व्यायाम फायदेशीर आहे. 

4. जम्प स्क्वॅट्स (Jumping Squats)

जम्प स्क्वॅट्स व्यायामामुळे कॅलरीज् जलदगतीने बर्न होण्यास मदत मिळते, परिणामी शरीराचे वजन नियंत्रणात राहील.

5. प्लँक (Plank)

प्लँक व्यायामामुळे कंबर आणि त्याच्या आसपासच्या अवयवांवरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. 

Fatty Liver: फॅटी लिव्हर होण्यामागे ही आहेत गंभीर कारणं, सुटका मिळवण्यासाठी काय खावं? वाचा संपूर्ण यादी

(नक्की वाचा: Fatty Liver: फॅटी लिव्हर होण्यामागे ही आहेत गंभीर कारणं, सुटका मिळवण्यासाठी काय खावं? वाचा संपूर्ण यादी)

6. दोरीच्या उड्या (Jump Rope)

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे दोरीच्या उड्या मारण्याचा व्यायाम. यामुळे हार्ट रेट वाढतो, कॅलरीज् बर्न होण्यास मदत मिळते. 

7. सूर्य नमस्कार (Surya Namaskar)

12 आसनांचा संच म्हणजे सूर्य नमस्कार. सूर्यनमस्काराचा सराव केल्यास संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल, शरीर लवचिक होण्यासही मदत मिळते. 

Amla Juice Benefits: सलग 15 दिवस आवळ्याचा ज्युस प्यायल्यास काय होईल?

(नक्की वाचा: Amla Juice Benefits: सलग 15 दिवस आवळ्याचा ज्युस प्यायल्यास काय होईल?)

8. माउंटेन क्लायंबर (Mountain Climber)

माउंटेन क्लायंबर व्यायामामुळेही शरीराचे वजन जलदगतीने कमी होण्यास मदत मिळते, विशेषतः पोट आणि कमरेवरील फॅट्स बर्न होण्यास मदत मिळते.

नियमित 30-40 मिनिटे हे व्यायाम केल्यास तुम्हाला महिनाभरात शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतील.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com