जाहिरात

Clove Benefits: झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह 2 लवंग चावून खा, हे गंभीर आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाहीत

Clove Benefits: किचनमधील गरम मसाल्याच्या डब्यातील सर्व मसाले केवळ स्वयंपाकाची चव वाढवत नाहीत तर शरीरासाठीही आरोग्यदायी असतात. गरम मसाल्यातील लवंगमुळे शरीराला कोणकोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया सविस्तर माहिती...

Clove Benefits: झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासह 2 लवंग चावून खा, हे गंभीर आजार तुम्हाला स्पर्शही करणार नाहीत
Clove Benefits: लवंग खाण्याचे फायदे

Clove Benefits News: प्रत्येकाच्या किचनमध्ये गरम मसाल्याचा स्वतंत्र डबा असतो. गरम मसाल्यामुळे खाद्यपदार्थांची चव वाढते. गरम मसाल्यातील लवंग रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास आरोग्याला असंख्य फायदे मिळतात, हे तुम्हाला माहितीये का? कारण लवंगमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, झिंक, मॅग्नीज, लोह यासारख्या कित्येक गुणधर्मांचा समावेश आहे. पोटाशी संबंधित समस्या असणाऱ्यांसाठी लवंग खाणे रामबाण उपाय ठरू शकतो. तसेच लवंगमुळे दातदुखीची समस्या देखील पटकन दूर होण्यास मदत मिळेल. लवंगाचे सेवन कोणत्या रुग्णांनी करावे, याची माहिती जाणून घेऊया...

(नक्की वाचा: Cloves Water Benefits: लवंगाचे पाणी प्यायल्यास काय होते?)

लवंग खाण्याचे फायदे (Clove Benefits)

1. त्वचा 

लवंगतील अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. त्वचेशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास रात्री झोपण्यापूर्वी लवंग (Clove Benefits News) खाऊन झोपावे.

2. पचनप्रक्रिया 

बद्धकोष्ठता, अतिसार, अ‍ॅसिडिटी इत्यादी पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका हवी असल्यास झोपण्यापूर्वी कोमट पाण्यातून लवंग खाऊ शकता. 

3. दातदुखी 

दातदुखी, हिरड्यांचे दुखणे, हिरड्या सूजणे किंवा हिरड्यांमध्ये होणारा संसर्ग यासारख्या समस्यांमुळे त्रस्त असाल तर नियमित कोमट पाण्यासह दोन लवंग (Clove Benefits News) खा.

(नक्की वाचा: Clove Benefits: नियमित लवंग खाण्याचे जबरदस्त फायदे)

4. सर्दी-खोकला

लवंगमध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यामुळे सर्दी, खोकला, घशातील खवखव यासारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. 

5. रोगप्रतिकारकशक्ती

लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी हे गुणधर्म आहेत, यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते. 

(नक्की वाचा: Clove Benefits : जेवणानंतर लवंग चावून खाल्ल्यास काय होते?)

6. रक्तशर्करेची पातळी

लवंग (Clove Benefits News) खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते. लवंगमध्ये युजेनॉल नावाचे तत्त्व असते, यामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते. कित्येक रीसर्चमधील माहितीनुसार लवंगातील पोषणतत्त्वांमुळे इन्सुलिनचा स्त्राव देखील वाढवण्यास मदत मिळते, जे मधुमेहींसाठी फायदेशीर मानले जाते. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com