
Benefits Of Walking Barefoot: नियमित काही मिनिटे चालण्याचा व्यायाम करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण अनवाणी चालण्याचे फायदे माहिती आहेत का? आयुर्वेदानुसार व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढून अनवाणी चालणे फायदेशीर ठरते. शरीराला कोणते लाभ मिळतील, किती वेळ अनवाणी चालावे, योग्य वेळ कोणती आणि कोणती काळजी घ्यावी, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया..
अनवाणी चालण्याबाबत तज्ज्ञांचे काय आहे म्हणणे?
एमडी (आयुर्वेद) डॉक्टर मनीषा मिश्रा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, अनवाणी चालणे ही सवय सामान्य नाहीय तर ही शरीर रीसेट करण्याची सोपी पद्धत आहे.
अनवाणी चालण्याचे फायदे जाणून घेऊया...
तीन दोषांची पातळी संतुलित होते
डॉक्टर मनीषा यांच्या मते आयुर्वेदानुसार वात, कफ आणि पित्त शरीरातील या तीनही दोषांची पातळी संतुलित असणे म्हणजे निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. अनवाणी चालल्याने हे दोष संतुलित राहण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: Morning Walk Benefits: उन्हाळ्यात सकाळी किती वेळ आणि कोणत्या वेळेस करावा वॉक?)
पाय आणि शरीराचे स्नायू मजबूत राहतात
अनवाणी चालल्याने पायांसह संपूर्ण शरीराचे स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते आणि शरीराचे पॉश्चर देखील सुधारते.
शारीरिक वेदनांपासून मुक्तता मिळते
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, पायाच्या टाचांचे दुखणे आणि पायांना येणारी सूज कमी होण्यास मदत मिळले.
(नक्की वाचा: Walking Benefits : रिकाम्या पोटी चालण्याचा व्यायाम केल्यास काय होईल? वाचा 8 मोठे फायदे)
चांगली झोप मिळेल
अनवाणी चालल्यास शरीराच्या नसांवर हलका ताण येतो, ज्यामुळे मन शांत होण्यास मदत मिळते आणि झोप देखील चांगली येते.
रोगप्रतिकारकशक्ती आणि ऊर्जा
माती किंवा गवतावर चालल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते, यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
दिवसभरात किती मिनिटे अनवाणी चालावे?
डॉक्टर मनीषा यांनी सांगितले की, दररोज 10-15 मिनिटे माती, रेतीच्या पाऊलवाटेवर अथवा गवतावर चालावे. काँक्रिटीच्या रस्त्यावर अनवाणी चालणे टाळावे.
अनवाणी चालण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
- आयुर्वेदिक डॉक्टरांच्या माहितीनुसार, सकाळी किंवा संध्याकाळी अनवाणी चालण्यासाठी उत्तम ठरू शकते.
- फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यांच्या कालावधीदरम्यान अनवाणी चालणे अधिक फायदेशीर ठरते, असे म्हणतात.
- फेब्रुवारी ते एप्रिल कालावधीदरम्यान शरीरामध्ये कफ दोष जास्त सक्रिय होते.
- गवत, माती किंवा रेतीवर अनवाणी चालल्यास कफ दोष संतुलित होण्यास आणि शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळते.
- याव्यतिरिक्त तुम्ही नियमितही अनवाणी चालण्याचा व्यायाम करू शकता.
- अनवाणी चालल्यास शरीरास कित्येक फायदे मिळतील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world