
How To Eat Egg: प्रोटीनचा सर्वात चांगला आणि स्वस्त स्त्रोत म्हणजे अंडे. विशेषतः जिममध्ये जाणारी मंडळी व्यायाम केल्यानंतर डाएटमध्ये अंड्यांचा समावेश करतात. पण अंडे खाण्याची योग्य पद्धत कोणती, यावरुन लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. काही लोकांना अंडे उकडून खायला आवडते तर काहींना ऑमलेट खाणे पसंत आहे, तर काही लोक कच्चेच अंडे खातात. तुमचाही यावरुन गोंधळ होतोय का, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
अंड्यामध्ये किती प्रोटीन असते?
अंडे प्रोटीनचे उत्तम स्त्रोत आहे, म्हणून लोक नियमित याचे सेवन करतात. एका अंड्यामध्ये जवळपास 6 ग्रॅम इतके प्रोटीनचे प्रमाण असते. म्हणजे चार अंडी खाल्ल्यास शरीराला 24 ग्रॅम प्रोटीनचा पुरवठा होईल.
अंडे खाण्याची योग्य पद्धत कोणती?
अंड्याचे सेवन करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, ज्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. पण सर्वाधिक फायदेशीर पद्धत कोणती आहे, यावरुन बहुतांश लोकांचा गोंधळ होतो. जिममध्ये जाणारी काही मंडळी कित्येकदा कच्चे अंडे खाणं पसंत करतात, याद्वारे शरीराला पूर्णपणे प्रोटीन मिळते, असे अनेकांना वाटते. तर काही लोक अंडी उकडूनही खातात, तर काहीजण तेल किंवा बटरमध्ये ऑमलेट तयार करुन खातात.
- कच्चे अंडे खाल्ल्यास संसर्ग होऊ शकतो, यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे कच्चे अंडे खाणे टाळावे.
- अंडे उकडून खाणं सर्वाधिक फायदेशीर मानले जाते, कारण यामध्ये अन्य कोणत्याही गोष्टींचा समावेश नसतो.
- ऑमलेट तयार करण्यासाठी तेल किंवा बटरचा वापर केला जातो, याद्वारे पोटामध्ये प्रोटीनसह कित्येक कॅलरीजही जातील.
- तुम्हाला उकडलेले अंडे खाणे पसंत नसेल तर हाफ फ्राय करुन खाऊ शकता.
- पॅनवर ब्रशच्या मदतीने हलक्या स्वरुपात तेल लावा आणि त्यावर अंडे फ्राय करा. आवश्यक असल्यास मसाला-मिठाचा वापर करू शकता.
(नक्की वाचा: Kitchen Tips: अंडे किती वेळ उकडावे?)
अंड्याचे बलक खावे की खाऊ नये?
अंड्याचे बलक खावे की खाऊ नये, यावरुनही काही लोक गोंधळलेले असतात. अंड्याचे केवळ पांढरा भाग खाणेच फायदेशीर असते, असा काही लोकांचा समज असतो. अंड्याच्या बलकामध्ये थोडेसे कोलेस्टेरॉल असते पण ते शरीरासाठी तितके हानिकारक नसते. त्यामुळे तुम्ही पूर्ण अंडे खाल्ले तर शरीरासाठी ते अधिक फायदेशीर ठरेल.
(नक्की वाचा: Egg Side Effects: सावधान ! या 4 लोकांनी अंडे मुळीच खाऊ नये, अन्यथा...)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world