Kidney Stones Treatment: बदलत्या जीवनशैलीनुसार हल्ली बहुतांश लोक मूतखड्याच्या (Mutkhada Upay) समस्येमुळे त्रस्त आहेत. मूत्रातील खनिजांमुळे मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गामध्ये खडे तयार होतात. जेव्हा लघवीमध्ये कॅल्शिअम, ऑक्सलेट, युरिक अॅसिड आणि फॉस्फेट यासारख्या खनिजांचे प्रमाण वाढते आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, त्यावेळे ही खनिजे एकत्रित येऊन त्याचे खडे तयार होतात. डिहायड्रेशन हे देखीस मूतखड्यांच्या समस्येस कारणीभूत ठरू शकते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी डाएटमध्ये एका खास फळाचा समावेश करू शकता.
सॉसेज वृक्षाचे फळ | Sausage Tree Fruit Benefits
सॉसेज वृक्षाच्या फळाचा तुम्ही डाएटमध्ये समावेश करू शकता. या फळामध्ये दुर्मीळ आणि आयुर्वेदिक गुणधर्मांचा मोठा साठा आहे. या वृक्षाचे फळ, त्याची साल आणि देठामध्ये आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे. या फळामध्ये लोह, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, झिंक, क्रोमियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स या गुणधर्मांचे प्रमाण जास्त आहे. हा वृक्ष आकाराने प्रचंड मोठे असते. या झाडाला काकडीच्या आकाराप्रमाणे लांबसडक फळं येतात. हे फळ खाण्याचे फायदे जाणून घेऊया...
सॉसेज वृक्षाचे फळ खाण्याचे फायदे | Sausage Tree Fruit Kadha
सॉसेज वृक्षाचे फळ खाल्ल्यास मूतखड्याची समस्या कमी होऊ शकते. या फळाच्या चूर्णाचे सेवन केल्यास मूतखडे शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळू शकते. मूतखड्यामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी सॉसेज वृक्षाच्या फळाचा काढा पिणे रामबाण उपाय मानला जातो. शिवाय शरीराची रोगप्रतिकारकशक्ती देखील मजबूत होईल.
(नक्की वाचा: Curd Benefits: दही कोणत्या महिन्यात खाऊ नये, दही खाण्याची योग्य वेळ कोणती? नुकसान-फायद्यांसह जाणून घ्या 8 FAQs)
सॉसेज वृक्षाच्या फळाचा काढा कसा तयार करावा? (How To Make Balam Kheera Kadha)
सामग्री-
- सॉसेज वृक्षाचे फळ
- पाणी
- आल्याची पेस्ट
- लिंबाचा रस
- मध (पर्यायी)
- पुदिना
- एका पॅनमध्ये पाणी गरम करत ठेवा, त्यामध्ये फळाचे कापलेले तुकडे उकळा.
- आल्याची पेस्टही मिक्स करा आणि काही मिनिटे पाणी उकळू द्यावे.
- गॅस बंद करा आणि पाणी गाळून घ्या त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करावा.
- हवे असल्यास मधही मिक्स करू शकता.
(नक्की वाचा: Raw Garlic Benefits: रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास काय होते, लसणाचं कोणी करावं सेवन? जाणून घ्या फायदे आणि योग्य पद्धत)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

