
Benefits of Salt Bath: धावपळीच्या जीवनामध्ये ताणतणाव, थकवा, शारीरिक वेदना यासारख्या समस्या सामान्य आहेत. छोट्या-छोट्या शारीरिक वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक पेन किलर गोळ्यांचा आधार घेतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही नैसर्गिक औषधोपचारांची मदत घेऊ शकता. यापैकीच एक उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे. हा उपाय केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याची योग्य पद्धत आणि यामुळे कोणते फायदे मिळतील, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
सी सॉल्ट म्हणजे काय?
सी-सॉल्ट म्हणजे समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून तयार केलेले मीठ. सामान्य मिठाच्या तुलनेत या मिठामध्ये मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि झिंक यासारख्या खनिजांचा समावेश असतो. या पोषणतत्त्वांमुळे त्वचा, स्नायू आणि सांध्यांच्या आरोग्यास असंख्य फायदे मिळतात.

मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे
त्वचेसाठी फायदेशीर
हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार, मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास त्वचेस असंख्य फायदे मिळतील. मृत त्वचेच्या पेशींची समस्या कमी होऊन नव्या पेशींची निर्मित होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त त्वचा हायड्रेट आणि मऊ राहण्यास मदत मिळते.
स्नायूदुखीपासून आराम मिळेल
दिवसभर काम करुन विशेषतः एकाच ठिकाणी आठ ते नऊ तास बसून काम केल्यानेही स्नायूदुखीची समस्या निर्माण होते. शरीराचे हे दुखणे कमी करण्यासाठी पेनकिलर औषधांची मदत घेण्याऐवजी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो, स्नायूंचे दुखणे कमी होते आणि विशेषतः थकलेल्या पायांना आराम मिळतो.
(नक्की वाचा: Toilet Cleaning Hacks: टॉयलेट सीटवर मीठ टाकल्यास काय होईल? सोप्या ट्रिकमुळे मिळेल मोठी मदत)

तणाव कमी होण्यास मदत मिळते
मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्यास केवळ शरीरच नव्हे तर मन शांत होण्यासही मदत मिळते. गरम पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्यास तणाव कमी होण्यास आणि चांगली झोप मिळण्यास मदत मिळेल. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर मानले जाते.
(नक्की वाचा: Best Morning Routine: सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय करावे? 5 गोष्टी फॉलो करा)

मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याची योग्य पद्धत
- बादलीभर गरम पाणी घ्या.
- पाण्यामध्ये जवळपास 1/4 कप ते दोन कप सी-सॉल्ट मिक्स करा.
- पाणी कोमट झाल्यास आणि मीठ व्यवस्थित विरघळल्यानंतर आंघोळ करावी.
- आंघोळ केल्यानंतर शरीराला मॉइश्चराइझर लावा.
- त्वचेवर एखादी जखम, संसर्ग, अॅलर्जी झाली असल्यास मिठाच्या पाण्याने आंघोळ करणं टाळावे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world