जाहिरात

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे शरीरात दिसतील ही गंभीर लक्षणे, तातडीने डाएटमध्ये या गोष्टी समावेश करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Vitamin B12 Deficiency Diet: धकाधकीच्या जीवनात बहुतांश लोक व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे त्रासलेले आहेत. मज्जासंस्था निरोगी राहण्यासाठी, शरीरातील ऊर्जा वाढण्यासाठी आणि लाल रंगाच्या रक्तपेशी वाढण्यासाठी व्हिटॅमिन B12 अतिशय आवश्यक आहे.

Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे शरीरात दिसतील ही गंभीर लक्षणे, तातडीने डाएटमध्ये या गोष्टी समावेश करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
Vitamin B12 ची कमतरता म्हणजे धोक्याची घंटा

Vitamin B12 Natural Sources: शरीरामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजांची कमतरता निर्माण झाली असल्यास त्याची लक्षणे शरीरावर सहजरित्या दिसतात. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे खाण्यापिण्याची सवयी. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे (Vitamin B12 Deficiency) आरोग्याशी संबंधित कित्येक समस्या निर्माण होऊ शकतात. शरीरामध्ये लाल रंगाच्या रक्तपेशींच्या निर्मितीसाठी, डीएनए सिंथेसिस आणि हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची (Vitamin B12) पातळी संतुलित असणे आवश्यक आहे. निरोगी जीवनासाठी डाएटमध्ये व्हिटॅमिन बी12 युक्त (Vitamin B12 Benefits For Health) पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. 

शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण झाल्यास थकवा, अशक्तपणा येणे आणि मूड बदलणे यासारख्याही समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या टाळण्यासाठी आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. 

शरीरातील व्हिटॅमिन B12ची पातळी कमी होण्याची कारणे आणि लक्षणे (Causes of Vitamin B12 Deficiency)

  • शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होण्यामागील मुख्य कारण म्हणजे अयोग्य लाइफस्टाइल तसेच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. 
  • डाएटमध्ये आवश्यक पोषक घटकांचा कमी प्रमाणात समावेश केला जातो, त्यावेळेस शरीरामध्ये कित्येक व्हिटॅमिन आणि खनिजांची कमतरता निर्माण होते. 
  • शाकाहारी तसेच प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. 
  • याव्यतिरिक्त पचनाशी संबंधित समस्या, शरीरातील पोषकघटकांची कमतरता, अती धूम्रपान किंवा मद्यपान करण्याची सवय देखील कारणीभूत ठरते. या समस्या टाळण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. 

(नक्की वाचा: Vitamin B12 Remedy: शरीरात 200च्या स्पीडने वाढेल व्हिटॅमिन B12,करा हा उपाय)

व्हिटॅमिन B12च्या कमतरतेची लक्षणे

  • थकवा येणे
  • अशक्तपणा जाणवणे
  • शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होणे
  • डोकेदुखी 
  • भूक न लागणे
  • त्वचा पिवळी पडणे
  • वारंवार तोंड येणे आणि तणाव येणे

व्हिटॅमिन B12ची कमतरता भरुन काढण्यासाठी डाएट (Vitamin B12 Rich Diet)

  • डाएटमध्ये लाल मांस, मासे, शेंगा, अंडी, बिया, सुकामेव्याचा समावेश करावा.
  • दूध आणि दूधयुक्त पदार्थ उदाहरणार्थ दही, पनीर आणि ताक यासारख्या गोष्टींचा समावेश करावा. 
  • वरील सर्व पदार्थांमध्ये व्हिटॅमिन B12चा साठा मोठ्या प्रमाणात आहे, ज्यामुळे रक्तपेशींची निर्मिती होण्यास मदत मिळते. 

व्हिटॅमिन B12साठी कोणता ज्युस प्यावा?

  • शरीरातील व्हिटॅमिन B12ची कमतरता दूर करण्यासाठी बीट आणि गाजरचा ज्युस प्यावा. 
  • विशेषतः बीट, डाळिंब आणि गाजरचा ज्युस प्यायल्यास शरीरामध्ये हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळेल. 
  • बीटमध्ये लोह, फॉलेट, व्हिटॅमिन बी12 यासारख्या पोषकघटकांचा समावेश आहे. 
  • गाजरमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन एमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. 

(नक्की वाचा: Vitamin B12: शरीरात दुपटीने वाढेल व्हिटॅमिन B12, प्या हा रस)

बीट आणि गाजर ज्युस कसा तयार करावा?

  • एक बीट आणि तीन गाजर स्वच्छ धुऊन घ्या. साल काढा आणि मिक्सरमध्ये वाटा. 
  • सकाळच्या नाश्त्यामध्ये बीट-गाजरचा ज्युस पिऊ शकता.  
  • गाजर-बीट ज्युसमुळे शरीरातील व्हिटॅमिन बी12ची कमतरता भरुन निघेल. 
  • शिवाय त्वचेवर तेज येईल आणि शरीराची ऊर्जा वाढण्यासही मदत मिळेल. 

हिरव्या भाज्यांचा रस आणि नारळ पाणी 

  • हिरव्या भाज्यांचा रस नारळाच्या पाण्यामध्ये मिक्स करा. याद्वारे शरीराला पोषकघटकांचा पुरवठा होईल.  
  • पालक, केल आणि कोबी यासारख्या हिरव्या भाज्यांमध्ये फायबर, फॉलेट, व्हिटॅमिन बी12चे प्रमाण जास्त आहे. 
  • नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलायट्सचे घटक आहेत. नारळ पाण्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासही मदत मिळते. 
  • वरील सर्व भाज्या एक कप या प्रमाणात घ्या आणि मिक्सरमध्ये वाटा.
  • अर्धा ग्लास नारळाच्या पाण्यामध्ये वाटलेल्या भाज्यांचे मिश्रण मिक्स करा. 
  • नियमित हा ज्युस प्यायल्यास शरीराला आवश्यक पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल आणि व्हिटॅमिन बी-12ची कमतरता भरुन निघेल. 

हिरवे सफरचंद आणि काकडीचा रस 

  • शरीरातील व्हिटॅमिन बी12ची कमतरता भरुन काढण्यासाठी हिरवे सफरचंद आणि काकडीचा ज्युस हा रामबाण उपाय आहे. 
  • सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B12चे घटक आहे. याद्वारे शरीर डिटॉक्स होण्यास आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल. 
  • काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण आणि शरीरास आवश्यक खनिजांचा समावेश आहे. 
  • या ज्युसमुळे शरीर हायड्रेट राहील आणि शरीराची पचनप्रक्रिया देखील सुधारेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com