Fasting Benefits: उपवास हे आता केवळ धार्मिक परंपरा राहिलेली नाही, तर लाइफस्टाइल ट्रेंड बनलाय. लोक शरीराचे वजन नियंत्रित करण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी उपवास करण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. विशेष म्हणजे योग्यरित्या केलेल्या उपवासामुळे संपूर्ण शरीरासह पचनसंस्थेला आराम मिळतो आणि ऊर्जा देखील वाढते. विशेषतः इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे 14 तासांच्या उपवासामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात. पण शरीराचे नुकसान होऊ नये, यासाठी तुम्ही किती तास उपवास करणं टाळावं; याचीही माहिती असणं आवश्यक आहे.
उपवास करण्याचे फायदे (Benefits Of Fasting)
- उपवास केल्यास पचनप्रक्रियेस आराम मिळतो, गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका मिळते.
- वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते, कारण शरीर जमा झालेल्या चरबीचा हळूहळू वापर करू लागते.
- उपवासामुळे रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते. याचे मेंदूवरही परिणाम होतात, मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.
- शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही मजबूत होते.
- गॅस, अॅसिडिटी यासारख्या समस्याही कमी होतील.
(नक्की वाचा: Magnesium Deficiency: शरीरात मॅग्नेशिअमची कमतरता निर्माण झाल्यास काय होतं? यावर काय उपाय करावे?)
14 तास उपवास करण्याचे फायदे (Benefits of 14-Hour Fasting)
14 तासांचा उपवास केल्यास शरीरातील फॅट्स जलदरित्या बर्न होतील. पोट हलके राहील, शरीरावरील सूज कमी होईल, रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहील. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहील.
(नक्की वाचा: Nutmeg Benefits: जायफळ खाल्ल्यास काय होतं? कसा करावा वापर, कोणते फायदे मिळतील? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली माहिती)
किती तास उपाशी राहावे? (How Many Hours You Should Not Stay Hungry)
साधारणतः 12 ते 16 तास उपाशी राहणे शरीरासाठी सुरक्षित मानले जाते. पण 16 तासांहून अधिक काळ उपवास करणं शरीरासाठी फायदेशीर नसते. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असेल, मधुमेह किंवा अन्य आजार असतील उपवास करू नये.
उपवास केल्यास कोणते आजार बरे होतील?- नियमित उपवास केल्यास शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.
- ठराविक दिवसांच्या अंतराने उपवास केल्यास वजन जलदगतीने कमी होते.
- शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहते.
- डाएटिशियनचाही सल्ला घ्यावा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

