
Clove And Lemon Benefits: गरम मसाल्यातील लवंगाचा कित्येक पाककृतींमध्ये वापर केला जातो. यामुळे जेवणाची चव वाढते. पण लवंग आणि लिंबाचे एकत्रित सेवन केलं तर कोणते फायदे मिळतील? हे तुम्हाला माहितीय का... आयुर्वेदानुसार या दोन्ही गोष्टींमध्ये औषधी गुणधर्मांचा साठा आहे. लवंग-लिंबू एकत्रित खाण्याचे फायदे जाणून घेऊया....
लवंग आणि लिंबाचा चहा कसा तयार करावा? How To Make Clove And Lemon Tea
सामग्री-
- पाणी
- लवंग
- चहा पावडर
- लिंबाचा रस
- मध (पर्यायी)
चहा कसा तयार करावा (How To Make
- सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा.
- यानंतर लवंग आणि चहा पावडर मिक्स करुन काही मिनिटे सामग्री उकळा.
- एका कपमध्ये चहा गाळा. त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा.
- तुम्हाला हवे असल्यास मध मिक्स करावे.
- लवंग आणि लिंबाचा चहा तुम्ही गरमागरम किंवा थंड करुनही पिऊ शकता.

लवंग आणि लिंबू खाण्याचे फायदे (Lavang Aani Limbu Khanyache Fayde)
1. रोगप्रतिकारक शक्ती
लवंगाची प्रकृती गरम असते आणि लिंबू हे व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत आहे. दोन्ही गोष्टींचे एकत्रित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळू शकते. शरीराचे कित्येक आजारांपासून संरक्षण होईल.
2. पचनप्रक्रिया
तुम्ही देखील पचनाशी संबंधित समस्यांपासून त्रस्त असाल तर लवंग आणि लिंबाचे एकत्रित सेवन करणे फायदेशीर ठरेल. कारण हे गुणधर्म पचनप्रक्रियेसाठी लाभदायक आहेत.
(नक्की वाचा: Lemon and Clove Remedy: लवंग आणि लिंबू एकत्र खाल्ल्यास काय होते? डॉक्टरांनुसार फक्त 3 दिवसांत शरीरात दिसेल मोठा फरक)
3. सर्दी आणि खोकला
बदलत्या हवामानानुसार सर्दी-खोकला यासारख्या समस्या निर्माण होत असतात. तुम्हाला देखील या समस्यांपासून सुटका हवी असेल तर लवंग-लिंबूचे एकत्रित सेवन करू शकता.
(नक्की वाचा: Lemon Honey Water Benefits: लिंबू-मधाचे पाणी पिण्याचे 7 फायदे)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world