Flax Seeds Benefits: आताच्या स्पर्धेच्या युगात काही-न्-काही आत्मसात करण्यासाठी सर्वचजण खूप व्यस्त झाले आहेत. पण स्पर्धेमध्ये त्यांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायलाही वेळ नाही. तणावपूर्ण जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतात. पचनप्रक्रियेपासून ते हार्मोन्स आणि वजन वाढणे यासारख्या गोष्टींचा सामना करावा लागतो. या समस्यांपासून शरीराचे संरक्षण करायचे असेल तर डाएटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. यापैकीच एक उत्तम पर्याय म्हणजे अळशीच्या बिया, या इवल्याशा बियांना सुपरफुड म्हणूनही ओळखले जाते. सलग 15 दिवस भाजलेल्या अळशीच्या बिया खाल्ल्यास शरीरामध्ये मोठे आणि सकारात्मक बदल दिसून येतील. अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी आवश्यक घटक आहेत.
1. बद्धकोष्ठता आणि पचनप्रक्रिया सुधारेल
भाजलेल्या अळशीतील डाएटरी फायबरमुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. नियमित या बियांचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येतून सुटका मिळेल आणि पोट स्वच्छ होईल. अपचन, गॅस, पोटदुखी यासारख्या समस्या कमी होतील.
अळशीच्या बियांचे कसे करावे सेवन?
एक चमचा भाजलेल्या अळशीच्या बिया चावून खा आणि त्यावर कोमट पाणी प्यावे.
2. आतड्यांचे आरोग्य
सलग 10-15 दिवस अळशीच्या बिया खाल्ल्यास शरीराची चयापचयाची गती जलद होण्यास मदत मिळेल. आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची निर्मिती होईल, ज्यामुळे पोटाचे आरोग्य निरोगी राहील आणि शरीराची ऊर्जेची पातळी कमी होणार नाही.
3. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सची पातळीअळशीच्या बियांमधील लिग्नन्स नावाचे तत्त्व शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. अनियमित पीरियड्सची समस्या असल्यास ती दूर होईल. मेनोपॉजची लक्षणं म्हणजे मूड बदलणे, शरीरात उष्णता निर्माण होणे इत्यादी समस्यांपासूनही सुटका मिळेल.
(नक्की वाचा: Curry Leaves Benefits: कढीपत्त्याचे पाणी किती दिवस प्यायल्यास केस लांबसडक होतील? कढीपत्ता कधी खाऊ नये? 17 FAQs)
4. वजन कमी होईलअळशीच्या बियांमध्ये फायबरचे घटक मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या उद्भवत नाही. परिणामी वजन कमी होण्यास मदत मिळेल.
अळशीच्या बिया खाण्याची योग्य वेळ
सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये अळशीच्या बिया खाणे फायदेशीर ठरेल.
(नक्की वाचा: Flaxseed Water Benefits: अळशीच्या बिया पाण्यात भिजवून खाल्ल्यास काय होते? न्युट्रिशनिस्टने सांगितले मोठे फायदे)
अळशीच्या बियांचे सेवन कसे करावे?- अळशीच्या बिया भाजून हवाबंद डब्यात ठेवा.
- रोज एक किंवा दोन चमचे भाजलेल्या अळशीच्या बियांचे सेवन करा.
- जास्त प्रमाणात बियांचे सेवन करू नका, अन्यथा पोटाचे आरोग्य बिघडेल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

