जाहिरात

Curry Leaves Benefits: कढीपत्त्याचे पाणी किती दिवस प्यायल्यास केस लांबसडक होतील? कढीपत्ता कधी खाऊ नये? 17 FAQs

Curry Leaves Eating Benefits: कढीपत्ता रोज खाल्ल्यास शरीरासह त्वचा आणि केसांना कोणकोणते लाभ मिळतील, जाणून घेऊया माहिती...

Curry Leaves Benefits: कढीपत्त्याचे पाणी किती दिवस प्यायल्यास केस लांबसडक होतील? कढीपत्ता कधी खाऊ नये? 17 FAQs
"Curry Eating Benefits: कढीपत्ता खाण्याचे फायदे आणि तोटे"
Canva

Curry Leaves Eating Benefits: भारतीय घरामध्ये जेवणाची फोडणी कढीपत्त्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कढीपत्त्यामुळे जेवणाला चवीसह सुगंधही छान येतो. तसेच इवल्याशा पानांमध्ये आरोग्यवर्धक गुणधर्मांचाही समावेश आहे. पण कढीपत्त्याबाबत लोकांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात, ज्यांचा शोध ही मंडळी गुगलच्या मदतीने घेतात. कढीपत्त्यामुळे खरंच केस काळे होतात का? रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहते का? रात्री झोपण्यापूर्वी कढीपत्ता खाऊ शकतो? यासह तुमच्याही मनातील प्रश्न आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया...

1. कढीपत्ता खाण्याचे फायदे | Curry Patta Benefits

कढीपत्त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. पचनयंत्रणाही मजबूत होते. सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्येपासून सुटका मिळते. ही पाने लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडचेही उत्तम स्त्रोत आहेत, यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत मिळेल. कोलेस्टेरॉल आणि रक्तशर्करेची पातळीही संतुलित राहते. 

2. कढीपत्ता खाण्याचे दुष्परिणाम| Curry Patta Side Effects

कढीपत्त्याचे आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात सेवन केल्यास याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या पानांचे मर्यादित स्वरुपात सेवन करावे.

3. कढीपत्ता खाण्याचे  दुष्परिणाम | KadhiPatta Khanyache Tote 

  • कढीपत्त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. ही पाने जास्त प्रमाणात चावून खाल्ल्यास किंवा पावडरचे सेवन केल्यास पचनप्रक्रियेवर ताण येऊ शकतो. यामुळे पोटदुखी, गॅस किंवा जुलाब यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.   
  • अ‍ॅलर्जी असल्यास त्वचेवर खाज येणे, रॅशेज येणे किंवा श्वास घेण्यास समस्या निर्माण होऊ शकते. 
  • कढीपत्ता खाणे मधुमेहग्रस्तांसाठी लाभदायक मानले जाते, यातील तत्त्वांमुळे रक्तातील शर्करेची पातळी कमी होण्यास मदत मिळते. पण एखादी व्यक्ती मधुमेहाच्या औषधांसह कढीपत्त्याचेही सेवन करत असेल तर साखरेची पातळी खूपच कमी होईल, या स्थितीस हायपोग्लायसीमिया असे म्हणतात. 
  • औषधोपचार सुरू असल्यास कढीपत्ता खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, यामुळे शरीराच्या चयापचयाच्या प्रक्रियेवर दुष्परिणाम होतील. 
  • रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कढीपत्ता खाल्ल्यास मळमळणे, उलटीचा त्रास होऊ शकतो.  
  • जास्त प्रमाणात कढीपत्ता खाल्ल्यास अ‍ॅसिडिटी, पोटात जळजळही होऊ शकते. 
  • दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात कढीपत्ता खाल्ल्यास लिव्हर, किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. 

4. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास काय होईल?

सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाच ते आठ पाने खाल्ल्यास सर्वाधिक फायदे मिळू शकतील. यातील पोषणतत्त्वांमुळे पोटातील एंझाइम्स उत्तेजित होतात आणि पचनप्रक्रिया सुधारते. पोटावरील चरबी कमी होण्यासह शरीर डिटॉक्स होण्यासही मदत मिळते. 

5. कढीपत्ता खाल्ल्यास कोणत्या आजारातून सुटका होईल?

  • मधुमेह: इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळेल.   
  • अ‍ॅनिमिया : कढीपत्त्यातील लोह आणि फॉलिक अ‍ॅसिडमुळे रक्ताची कमतरता भरुन निघेल.
  • केस : कढीपत्त्यातील पोषणतत्त्वांमुळे मुळासकट केसांना पोषणतत्त्वांचा पुरवठा होईल.  
  • पचनप्रक्रिया: बद्धकोष्ठता, अपचन, जुलाब यासारख्या समस्यांपासून आराम मिळेल.

6. कढीपत्ता आणि कडुलिंबाच्या पानांमध्ये काय फरक आहे? | Curry Patta And Neem Leaves Difference 

कढीपत्ता आणि कडुलिंबाची पाने दिसायला एकसारखीच दिसतात, पण चव - गुणधर्म पूर्णपणे भिन्न आहेत. कढीपत्त्याचा स्वयंपाकामध्ये समावेश केला जातो, कडुलिंबाच्या पानांचा नाही. कडुलिंबाच्या पानांतील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळेल.  

7. दिवसभरात किती प्रमाणात कढीपत्त्याचे सेवन करावे? 

  • दिवसभरात कढीपत्त्याची आठ ते 15 ताजी पाने खाणे फायदेशीर ठरू शकते. 
  • रिकाम्या पोटी पाने चावून खाऊ शकता. 
  • ताक, डाळ, भाज्या, कढीमध्येही कढीपत्त्याचा समावेश करू शकता.   

8. कढीपत्त्याचे पाणी किती दिवस प्यायल्यास केस लांबसडक होतील? 

आठवड्यातून तीन ते चार वेळ कढीपत्त्याचे पाणी प्यायल्यास तीन ते सहा महिन्यांत केसांमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळतील. नवीन केसांची वाढ होईल.   

9. कढीपत्ता कधी खाऊ नये?

  • रात्री झोपण्यापूर्वी कढीपत्ता खाणे टाळा, यामुळे झोपेवर परिणाम होतील.  
  • अ‍ॅलर्जी असल्यास कढीपत्ता खाणे टाळावे.  
  • रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात कढीपत्ता खाण्याची चूक करू नका, पोटाचे आरोग्य बिघडू शकते. 

10. हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास कढीपत्त्याचा कसा वापर करावा?

  • पोटॅशिअम आणि खनिजांमुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.  
  • रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पाच ते आठ पाने चावून खा. 
  • रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर पाण्यात कढीपत्त्याची 10-15 पाने भिजत ठेवा, सकाळी उठल्यानंतर पाणी गाळून रिकाम्या पोटी प्यावे. 
  • डाळ, भाजी, ताकामध्येही कढीपत्त्याचा समावेश करू शकता.   

Urinary Tract Infection Causes: लघवी करताना जळजळ होते, वारंवार पण थोडीच लघवी होते?  वाचा उपाय आयुर्वेदिक उपाय

(नक्की वाचा: Urinary Tract Infection Causes: लघवी करताना जळजळ होते, वारंवार पण थोडीच लघवी होते? वाचा उपाय आयुर्वेदिक उपाय)

11. कढीपत्त्यामध्ये कोणकोणते व्हिटॅमिन्स होते? 

  • व्हिटॅमिन A (बीटा-कॅरोटीन ): हे दृष्टी आणि त्वचेसाठी खूप महत्त्वाचे आहे.
  • व्हिटॅमिन C: रोगप्रतिकारक शक्ती आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
  • व्हिटॅमिन B ग्रुप : व्हिटॅमिन B2 (रायबोफ्लेविन) आणि व्हिटॅमिन B9 (फॉलिक अ‍ॅसिड) देखील चांगले स्त्रोत आहे, अ‍ॅनिमियासारख्या आजाराचा धोका कमी होतो. 

12. कढीपत्त्याचे पानी रोज पायल्यास काय होईल? 

1. पचनप्रक्रिया सुधारेल, अ‍ॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतील.
2. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जाऊन अतिरिक्त चरबी जमा होणार नाही.  
3. मधुमेहाग्रस्तांच्या शरीरातील रक्तशर्करेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळले. 
4. व्हिटॅमिन ए आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा - केसांचे आरोग्य सुधारेल. 

13. कढीपत्त्यामुळे मधुमेह नियंत्रणात कसे राहू शकते?

कढीपत्त्यामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, हे घटक रक्तशर्करेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. 

14. वजन कमी होते का?

कढीपत्त्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते, कढीपत्त्यातील कम्पाउंडमुळे शरीरातील चरबी जमा होण्याचे प्रमाण कमी होते. पचनप्रक्रिया सुधारते, विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात, यामुळे वजन कमी होते. 

15. कढीपत्त्यामध्ये कोणत्या व्हिटॅमिनचा समावेश आहे?  

कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह आणि फॉलिक या गुणधर्मांचा साठा आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अमिनो अ‍ॅसिड्सचाही समावेश आहे. 

Tea Benefits And Side Effects: चहा किती कप प्यावा? 30 दिवस चहा न पिण्याचे फायदे, तुपाचा चहा प्यावा का? 20 FAQS

(नक्की वाचा: Tea Benefits And Side Effects: चहा किती कप प्यावा? 30 दिवस चहा न पिण्याचे फायदे, तुपाचा चहा प्यावा का? 20 FAQS)

16. कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळेल?  

कढीपत्त्यातील अँटी-ऑक्सिडंट्समुळे धमण्यांचे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत मिळते.  

17. कढीपत्त्याचा केसांसाठी वापर कसा करावा?

नारळाचे तेल किंवा मोहरीचे तेल गरम करा,  कढीपत्त्याचा रंग काळा होईपर्यंत तेल गरम करा. 
तेल थंड झाल्यानंतर गाळा आणि आठवड्यामध्ये दोन ते तीन वेळा केसांना लावा.   
कढीपत्त्याची पाने दह्यामध्ये वाटून पॅक तयार करुन केसांना लावा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com