जाहिरात

Best Morning Routine: सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय करावे? 5 गोष्टी फॉलो करा

Best Morning Routine: सकाळी उठल्यानंतर काय करावे जेणेकरून दिवसभरात थकवा जाणवणार नाही आणि मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहील.

Best Morning Routine: सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम काय करावे? 5 गोष्टी फॉलो करा
"Health News: सकाळी उठल्यानंतर ही पाच कामं नक्की करा"
Canva

Best Morning Routine: सकाळची वेळ आपल्या शरीराची दिवसभराची ऊर्जा आणि मूड निश्चित करते. दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने केल्यास संपूर्ण दिवस तुम्हाला सकारात्मक आणि ताजेतवाने वाटेल. प्रत्येक कामामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने लक्ष केंद्रित करू शकाल, यामुळे तुमची सर्व कामं देखील उत्तमरित्या पार पडतील. सकाळी उठल्यानंतर कोणकोणती कामं करावी, जेणेकरून दिवसभरात तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि मेंदूचीही कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहील. 

मोबाइल पाहणं टाळावे

बहुतांश लोक सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मोबाइल तपासतात, ही सवय अतिशय चुकीची आहे. सोशल मीडियामुळे मेंदूवर ताण येऊ शकतो आणि काही गोष्टी पाहून तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे मोबाइल पाहणे टाळावे. स्वतःला वेळ द्या.  

सकाळी उठल्यानंतर पाणी प्या

रात्रीच्या विश्रांतीमुळे शरीर हायड्रेट होणं आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे शरीर हायड्रेट होईल शिवाय शरीरातील टॉक्सिन्स बाहेर फेकले जातील. पचनप्रक्रिया सुधारल्यास त्वचेवर नैसर्गिक तेज देखील येईल. 

कोवळे ऊन अंगावर घ्या

पाणी प्यायल्यानंतर सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्या. सूर्यप्रकाशाद्वारे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, यामुळे हाडे आणि शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच मूड देखील चांगला होता आणि शरीराची ऊर्जा देखील वाढते.   

व्यायाम किंवा योग करा 

सकाळी उठल्यानंतर व्यायाम केल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही सक्रिय असते. वर्कआऊट करणं शक्य नसेल तर कमीत कमी 10-15 मिनिटे स्ट्रेचिंग किंवा योग करा. रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारते, स्नायूंना आराम मिळतो आणि शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा टिकून राहते.   

Expensive Almonds Cost: कोणते बदाम सर्वाधिक महागडे आहे? 1 Kg बदामाची किंमत आणि खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

(नक्की वाचा: Expensive Almonds Cost: कोणते बदाम सर्वाधिक महागडे आहे? 1 Kg बदामाची किंमत आणि खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या)

पौष्टिक नाश्ता करणं आवश्यक 

नाश्ता करणं अतिशय आवश्यक आहे. नाश्त्यामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण अधिक असते, यामध्ये अंडी, ओट्स, दही, फळ किंवा मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा.  

Constipation Home Remedy: सकाळी पोट स्वच्छ होत नाही? 3 गोष्टी पाण्यात मिक्स करुन प्या, पटकन डिटॉक्स होईल शरीर

(नक्की वाचा: Constipation Home Remedy: सकाळी पोट स्वच्छ होत नाही? 3 गोष्टी पाण्यात मिक्स करुन प्या, पटकन डिटॉक्स होईल शरीर)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com