
Pan Card For Minor: आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्ताऐवज आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यव्हारापासून ते सरकारी कामांपर्यत प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड या कागदपत्राची मागणा केली जाते. म्हणूनच 18 वर्ष पूर्ण झाल्यास पॅन कार्ड तयार केले जाते. मात्र आता 18 वर्षांखालील तरुणांनाही पॅन कार्ड बनवता येते. पण, त्यासाठी मुलांच्या वतीने त्यांचे पालक अर्ज करू शकतात.
(नक्की वाचा: एकापेक्षा अधिक PAN CARD वापरताय? इतकी मोठी होईल दंडात्मक कारवाई, जाणून घ्या नियम )
सर्वप्रथम यूटीआयआयटीएसएल ( UTIITSL) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
'नवीन पॅन' या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर 'पॅन कार्ड फॉर्म 49A' पर्याय निवडा.
समोर एक पेज ओपन होईल त्यावर विचारलेली सर्व माहिती अचूक भरा.
माहिती भरून झाल्यावर आवश्यक शुल्क ऑनलाइन किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे भरा.
त्यांतर एक पावती स्लिप मिळेल, ज्यामध्ये 15-अंकी पोचपावती क्रमांक असेल.
फॉर्म 49A ऑनलाइन सबमिट केल्यानंतर 15 दिवसांच्या आत UTIITSL कार्यालयात सहाय्यक कागदपत्रे पाठवा किंवा तुमच्या अर्जावर ई-स्वाक्षरी करण्यासाठी आधार OTP व्हेरिफाय करा.
पोचपावती फॉर्म संबंधित कार्यालयात पाठवल्यानंतर पॅन क्रमांकाची पडताळणी केली जाईल.
पॅन पडताळणीनंतर, पॅन नंबरची पडताळणी केली जाईल आणि कार्ड तयार केले जाईल.
अर्ज जमा (सबमिट) केल्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड यशस्वी 15 दिवसांच्या आत तुम्ही दिलेल्या पत्त्यावर मिळेल.
(नक्की वाचा: 'वन नेशन, वन स्टुडंट आयडी', विद्यार्थ्यांसाठी APPAR ID महत्त्वाचे! जाणून घ्या कार्डचे महत्त्व आणि कसा कराल अर्ज?)
पॅन कार्डसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे -
1. अल्पवयीन मुलाच्या पालकांचा पत्ता आणि ओळखीचा पुरावा.
2. अर्जदाराचा पत्ता आणि ओळखीचा पुरावादेखील आवश्यक आहे.
3. अल्पवयीन व्यक्तीच्या पालकांचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा रेशन कार्ड किंवा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्रसुद्धा चालेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world