
- Parathas offer slow-releasing carbs and dietary fibre from whole wheat flour
- Stuffed parathas provide protein which aids muscle repair and satiety
- Poha is low in calories and fat, making it suitable for weight management
सकाळचा नाश्ता हा दिवसभर उत्साही राहण्यासाठीचा आधार असतो. भारतीय घरांमध्ये नाश्त्यासाठी पोहे आणि पराठा हे दोन पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात. दोन्ही चविष्ट, बनवायला सोपे आणि आवडीनुसार बदल करता येणारे आहेत. पण आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, या दोघांमध्ये सर्वात उत्तम पर्याय कोणता आहे? याबद्दल जाणुन घेऊयात.
पराठ्याचे आरोग्यदायी फायदे
- पराठा सहसा संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवलेला असतो, ज्यामुळे त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत.
- गव्हाच्या पिठातील कार्बोहायड्रेट्स शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवतात. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते, भूक लागत नाही आणि तुम्ही अधिक काळ सक्रिय राहता.
- संपूर्ण गव्हाच्या पराठ्यांमध्ये आहारातील फायबर असते, जे पचनक्रिया निरोगी ठेवते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पांढरा ब्रेड किंवा पुरीसारख्या पदार्थांपेक्षा हा अधिक संतुलित पर्याय आहे.
- पनीर, डाळ किंवा पालक यांसारख्या घटकांनी भरलेला पराठा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत बनतो. प्रथिनांमुळे स्नायूंची दुरुस्ती होते आणि पोट भरलेले राहते. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे सोपे जाते.
- पराठा बनवताना कमीत कमी तेल वापरल्यास किंवा तुपाऐवजी ऑलिव्ह तेल वापरल्यास कॅलरी मोठ्या प्रमाणात कमी होतात. तसेच, त्यात नाचणी किंवा ओट्सचे पीठ मिसळल्यास तो अधिक पोषक बनतो.
- मेथी, बीट किंवा मिश्र भाज्या वापरून पराठ्याचे अनेक प्रकार बनवता येतात. प्रत्येक प्रकारात वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळतात. पराठा लोणी किंवा लोणच्याऐवजी दही किंवा सॅलडसोबत खाल्ल्यास तो अधिक संतुलित नाश्ता ठरतो.
(नक्की वाचा- Green Pickle Recipe: 15 मिनिटांत घरच्या घरी झटपट तयार करा मिरचीचे लोणचे)

Photo Credit: iStock
पोह्यांचे आरोग्यदायी फायदे
- चपटे केलेले तांदूळ म्हणजे पोहे, जो हलका आणि झटपट होणारा नाश्ता आहे.
- पोहे लवकर शिजतात आणि पोटासाठी हलके असतात. त्यामुळे गरमीच्या किंवा दमट हवामानासाठी हा एक उत्तम नाश्ता आहे.
- पोह्यांमध्ये नैसर्गिकरित्या चरबीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कॅलरी नियंत्रित ठेवणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम आहे. यामुळे तुम्हाला आळस न येता दिवस सुरू करण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळते.
- पोहे लोहाचा एक चांगला स्रोत आहेत. विशेषतः जेव्हा ते लोखंडी कढईत बनवले जातात. पोह्यांमधील कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक वाढ किंवा घट न करता स्थिर ऊर्जा देतात.
- पोह्यांमध्ये वाटाणा, कांदा किंवा गाजर यांसारख्या भाज्या घातल्यास ते फायबर आणि आवश्यक व्हिटॅमिन्सनी परिपूर्ण तो एक संतुलित आहार बनते.
- पोहे कमी तेलात तयार केले जात असल्याने ते पचनासाठी चांगले असतात. कढीपत्ता, हळद आणि मोहरी यांसारखे मसाले वापरल्यास आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते.

Photo Credit: iStock
पोहे की पराठे? आरोग्यासाठी उत्तम काय?
आरोग्यदायी नाश्ता निवडायचा झाल्यास, पोहे किंचित सरस ठरतात. पोहे हलके, कमी फॅट आणि पचायला सोपे असतात, ज्यामुळे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
मात्र योग्य घटक आणि कमी तेल वापरून बनवलेला पराठा हेल्थी ठरतो. जर तुम्हाला अधिक ऊर्जा आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटणारा नाश्ता हवा असेल, तर तुम्ही पराठा निवडू शकता.
हलका, कमी फॅटचा आणि पचनासाठी सोपा नाश्ता हवा असल्यास पोहे निवडा. याउलट, तुम्हाला भरपूर ऊर्जा देणारा आणि दीर्घकाळ भूक लागू न देणारा नाश्ता हवा असल्यास पराठा निवडा.