जाहिरात

Parenting Tips: संपूर्ण दिवस फोनला चिकटून असतात तुमची मुलं? फॉलो करा 5 टिप्स, कमी होईल स्क्रीन टाइम

How To Reduce Children's Screentime: आईवडिलांना त्यांच्या कामातून वेळ मिळत नसल्याने हल्ली लहान मुलांचे फोनमध्ये गुंतून राहण्याचे प्रमाण वाढलंय. पण यामुळे मेंदूच्या आरोग्यासह डोळ्यांवरही वाईट परिणाम होतात.

Parenting Tips: संपूर्ण दिवस फोनला चिकटून असतात तुमची मुलं? फॉलो करा 5 टिप्स, कमी होईल स्क्रीन टाइम
"Parenting Tips: मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करावा?"
Canva

Parenting Tips: डिजिटलच्या युगात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच स्मार्टफोनचं व्यसन लागलंय. विविध कारणांनिमित्त फोनचा वापर करण्यासाठी लोक कित्येक तास खर्च करतात. वयोमान कोणतेही असो स्मार्टफोनच्या अतिवापराचे शरीरावर वाईट परिणाम होतात. विशेषतः लहान मुलांच्या मेंदूचा विकास योग्य पद्धतीने होत नाही. फोन-लॅपटॉपपासून मुलांना दूर ठेवणं ही गोष्ट पालकांसाठी आव्हानात्मक ठरतेय. मोबाइलच्या अतिवापरामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही दुष्परिणाम होतात. लहान मुलांचा स्क्रीनटाइम कमी करण्यासाठी काही खास उपाय जाणून घेऊया... 

1. वेळेची मर्यादा ठरून द्या

मुलांनी किती वेळ फोन वापरायचा, यासाठी वेळेची मर्यादा ठरावा. लहान मुलांचा जास्तीत जास्त स्क्रीनटाइम दोन तास असावा. यामध्ये फोन, टीव्ही, टॅब यासह सर्व गोष्टींचा समावेश असावा. मुलांच्या हातून लगेचच फोन खेचून घेऊ नये. त्यांना प्रेमाने समजून सांगावे, त्यामुळे होणारे दुष्परिणामांची माहिती द्या.

2. आदर्श निर्माण करा

तुमच्या मुलांसाठी त्यांचे आईवडील आदर्श असतात. तुम्ही ज्या गोष्टी करणार त्याच गोष्टी तुमची मुलं शिकणार. तुम्ही स्वतः फोनचा अति वापर करणं टाळा. याऐवजी मुलांसोबत खेळ खेळा किंवा त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारा. 

3. मोबाइलचे आमिष देऊ नका 

अभ्यास केला तर मोबाइल देईन, जेवण केलं तर मोबाइल अशा पद्धतीचे आमिष मुलांना देऊ नका. यामुळेच त्यांना वाईट सवय लागू शकते. 

4. मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा

काही पालकच कामामध्ये व्यस्त असतात आणि मुलांनी त्यांच्या कामात व्यत्यय आणू नये, यासाठी ते मोबाइल देण्याचा पर्याय स्वीकारतात. हे वागणं अतिशय चुकीचे आहे. याऐवजी मुलांना काही खेळ खेळण्यास सांगू शकता, काम जास्त महत्त्वाचं नसेल तर मुलांना वेळ द्यावा. 

Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त थंडी लागते? जाणून घ्या

(नक्की वाचा: Winter Health Tips: कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे जास्त थंडी लागते? जाणून घ्या)

5. अन्य पर्याय

मोबाइलऐवजी मैदानी खेळ, चित्रकला, हस्तकला, स्केटिंग, सायकल चालवणे यासारख्या गोष्टी तुम्ही मुलांना करण्यास सांगू शकता. यामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचा योग्य विकास होण्यास मदत मिळेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com