जाहिरात

Health News: आले-लसूण एकत्र खाल्ल्यास काय होते? फायदे होतात की तोटे? सत्य ऐकून विश्वास बसणार नाही...

आल्यामध्ये 'जिंजरॉल' नावाचा सक्रिय घटक असतो.

Health News: आले-लसूण एकत्र खाल्ल्यास काय होते? फायदे होतात की तोटे? सत्य ऐकून विश्वास बसणार नाही...
  • आले आणि लसूण हे स्वयंपाकातील घटक असून त्यांच्यातील आरोग्यदायी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहेत
  • आलेतील जिंजरॉल सूज कमी करून मळमळ आणि व्यायामानंतरची वेदना आराम करतो
  • लसणातील ॲलिसिन जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यासाठी तसेच रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Garlic With Ginger: आले आणि लसूण हे स्वयंपाकघरातील दोन महत्त्वाचे घटक आहेत. जे केवळ पदार्थांना चव देत नाहीत, तर त्यांच्यामध्ये आरोग्यासाठीचे अनेक महत्त्वपूर्ण गुणधर्म देखील आहेत. अनेकांच्या मनात याविषयी एक गैरसमज असतो की, हे दोन्ही घटक एकत्र खाल्ल्यास  त्यांचे फायदे कमी होतात. मात्र, वैद्यकीय आणि पोषण तज्ज्ञांच्या मते, ही केवळ एक गैरसमजूत (Myth) आहे. मग आले लसणू एकत्र खाण्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. 

आल्यामध्ये 'जिंजरॉल' नावाचा सक्रिय घटक असतो. जो शरीरातील सूज (Inflammation) कमी करण्यास आणि पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवण्यास मदत करतो. याव्यतिरिक्त, आले मळमळ कमी करणे. व्यायामानंतरच्या वेदनांवर आराम देणे आणि रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. दुसरीकडे, लसणामध्ये 'ॲलिसिन' नावाचा प्रभावी घटक असतो. जो जीवाणू आणि विषाणूंशी लढण्यास मदत करतो. 

नक्की वाचा - Health News: मासिक पाळीत अननस खाणे चांगले की वाईट? एक्सपर्टची नवी माहिती

लसणाच्या सेवनाने रक्तदाब कमी होतो. उत्तम कोलेस्टेरॉलचे (Good Cholesterol) प्रमाण वाढते आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट होते. विशेष म्हणजे, लसणामुळे रोगप्रतिकारक पेशींचे कार्य सुधारते. ज्यामुळे शरीर संसर्गाशी प्रभावीपणे लढू शकते. जेव्हा आले आणि लसूण हे दोन्ही घटक एकत्र येतात, तेव्हा त्यांची अँटीऑक्सिडंट (Antioxidant) क्षमता केवळ कमी होत नाही, तर ती वाढते. 

नक्की वाचा - Health News: फुफ्फुसं ‘Silent Mode' मध्ये जातात! COPD चे लपलेले ‘ते' लक्षण समोर

या दोन्हींमध्ये असलेले सक्रिय घटक वेगवेगळ्या मार्गांनी शरीरावर परिणाम करतात आणि जेव्हा त्यांचा संगम होतो. तेव्हा त्यांचा एकत्रित परिणाम अधिक शक्तिशाली (Synergistic Effect) होतो. उदाहरणार्थ, जिंजरॉल आणि ॲलिसिन हे दोन्ही दाह कमी करण्यास मदत करतात. ज्यामुळे त्यांचे मिश्रण स्वतंत्रपणे वापरण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरते. थोडक्यात, आले आणि लसणाचे मिश्रण आरोग्यासाठी अधिक फायदेशीर सिद्ध होते, त्यांचे फायदे कमी होत नाहीत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com