जाहिरात

Relation Tips:पार्टनर मोठी वचनं देतोय,तुम्ही फ्युचर-फेकिंगचा बळी ठरताय? Future Faking डेटिंग ट्रेंड म्हणजे काय

Future Faking Trend: डेटिंगच्या विश्वात अनेकदा नवनवीन शब्द आणि ट्रेंड्स ऐकायला मिळतात. फ्युचर फेकिंग हा देखील नवीन शब्द सध्या ट्रेंडमध्ये आहे, पण काय आहे या शब्दाचा अर्थ?

Relation Tips:पार्टनर मोठी वचनं देतोय,तुम्ही फ्युचर-फेकिंगचा बळी ठरताय? Future Faking डेटिंग ट्रेंड म्हणजे काय
"Future Faking Trend: फ्युचर फेकिंग ट्रेंड म्हणजे काय?"
Canva

Relationship Tips: प्रेमात पडल्यानंतर व्यक्तीचं आयुष्य बदलतं. जोडपी आपल्या आयुष्याचे नियोजन करू लागतात आणि एकत्रित पुढे कसं जायचे, याचीही स्वप्न पाहू लागतात. डेटिंगच्या जगात अनेकदा नवीन शब्द आणि ट्रेंड्स ऐकू येतात, ज्यामुळे नातेसंबंध समजून घेण्याच्या आपल्या पद्धतींमध्ये बदल होतो. असाच एक नवा शब्द सध्या ट्रेंडमध्ये आहे तो 'फ्युचर-फेकिंग' (Future Faking).

फ्युचर फेकिंग शब्दाचा अर्थ काय?

फ्युचर फेकिंग म्हणजे भविष्याबाबत दिलेली आश्वासनं कधीही पूर्ण होत नाहीत. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीसोबत नातेसंबंध निर्माण करण्यापूर्वी तुमचा जोडीदार खरी की खोटी आश्वासनं देतोय? हे जाणून घेण्यासाठी 'फ्युचर-फेकिंग' ट्रेंडबाबत सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. 

फ्युचर-फेकिंग ट्रेंड | Future Faking Dating Trend

फ्युचर-फेकिंग ट्रेंड म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती भविष्याबाबत मोठमोठी वचनं देतो किंवा देते, उदाहरणार्थ एकत्रित सुटीवर जाऊया किंवा एकत्रित राहुया. पण प्रत्यक्षात संबंधित व्यक्तीची असं काहीही करण्याची योजना नसते. हा केवळ एक भावनिक खेळ आहे, ज्याद्वारे समोरच्या व्यक्तीला भविष्याबाबत स्वप्न पाहण्यास भाग पाडायचे आणि स्वतःमध्ये अडकवून ठेवायचे.

How To Stop Snoring: घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवायचीय? फॉलो करा 10 जबरदस्त टिप्स

(नक्की वाचा: How To Stop Snoring: घोरण्याच्या समस्येतून सुटका मिळवायचीय? फॉलो करा 10 जबरदस्त टिप्स)

फ्युचर-फेकिंग ट्रेंडचे संकेत

  • दिलेले वचन कधीही पूर्ण होत नाहीत.
  • तुमचा पार्टनर ठोस योजना आखण्यापासून पळ काढतो/काढते.
  • आपलं आयुष्य कायम 'नंतर करू'/ 'नंतर पाहू' अशा स्थितीमध्ये अडकल्याची जाणीव होणे.  
  • जोडीदार आपला विश्वासघात करतोय, ही जाणीव होणे.

Husband Wife Relationship: पती-पत्नीमध्ये भांडणं झाल्यानंतर काय करावं? वाद दूर करण्यासाठी जाणून घ्या 7 उपाय

(नक्की वाचा: Husband Wife Relationship: पती-पत्नीमध्ये भांडणं झाल्यानंतर काय करावं? वाद दूर करण्यासाठी जाणून घ्या 7 उपाय)

फ्युचर-फेकिंग हे गॅसलायटिंग सारख्या व्यवहाराशी जोडलेले आहे, ज्यामुळे भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते; ही परिस्थिती तुम्हाला वारंवार वास्तविक जीवनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास भाग पाडते. दोन्ही पद्धती तुम्हाला तुमच्या नात्यात अडकवून ठेवतात आणि पुढे जाण्यापासून रोखतात. फ्युचर फेकिंग हा शब्द नवा नाही, पण याद्वारे तुम्हाला नात्यांचे हानिकारक पॅटर्न ओळखणे आणि स्वतःच्या भावना समजून घेण्यास मदत मिळेल. एखाद्या फसवलं असे म्हणण्याऐवजी या पॅटर्नला सध्या फॅन्सी नाव मिळालंय. त्यामुळे मंडळींनो कोणत्याही खोट्या नात्यामध्ये अडकू नका.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com