उन्हाळा सुरु होताच थंडपेय पिण्याचं प्रमाण वाढू लागतं. उन्हामुळे कोरडा पेय पिण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. त्यामुळे उन्हाळ्यात रस्त्याच्या बाजूला सरबत तसंच कोल्ड ड्रिंक्स सहजपणे मिळतात. या थंड पेयात विशेषत: रमजान महिन्यातील इफ्तार पार्टीमध्ये 'रूह अफजा' हे चांगलंच लोकप्रिय आहे. लाल रंग आणि मनमोहक गुलाबाची चव असलेलं हे पेय अनेकांना आवडतं. रोजा सोडताना इफ्तारमध्ये या पेयाचा समावेश करणे ही आता एक परंपरा बनली आहे.
काय आहे इतिहास?
रूह अफजाचा हा इतिहास एक शतकापेक्षा जुना आहे. जुन्या दिल्लीमधील हकीम हाफिज अब्दुल मजिद यांनी हे पेय तयार केलं. कडक उन्हाळ्यापासून सुटका करण्यासाठी एक थंड पेय बनवण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी फळं, जडी-बुटी, फुलं यांचं खास मिश्रण तयार केलं. त्यामध्ये गुलाब पाणी आणि पानदानचं अचूक प्रमाण मिसळलं. हे सर्व वापरुन तयार केलेल्या पेयाला त्यांनी 'रूह अफजा' हे नाव दिलं. 'आत्मा ताजा करणारे' असा याचा अर्थ आहे. या पेयानं अगदी कमी कालावधीमध्ये देशभर खास स्थान निर्माण केलं.
ग्राहक झालेत फिटनेस फ्रीक, नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये देशी-परदेशी फळांच्या मागणीत वाढ
दिल्लीच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी बनवण्यात आलेल्या रूह अफजानं संपूर्ण दक्षिण आशिया, आखादी देशांसह जगभरात लोकप्रियता मिळवली.
हमदर्द लॅब्सच्या अधिकृत वेबसाईटनुसार 1906 मध्ये हकीम हाफिज अब्दुल मजिद यांनी जुन्या दिल्लीत 'हमदर्द' हे युनानी क्लिनिक सुरु केले. त्यांनी 1907 मध्ये 'रुह अफजा' हे फ्रेश ड्रिंक बनवले. 'आत्माचा कायाकल्प' असा याचा उर्दूमधील अनुवाद आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीनंतरही हे उन्हाळ्यातील लोकप्रिय ड्रिंक आहे.
नॅशनल पब्लिक रेडिओनुसार माजिद यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनी हा व्यवसाय सुरु ठेवला. 1947 साली भारताची फाळणी झाली. त्यावेळी त्यांचा एअक मुलगा दिल्लीतच राहिला. तर दुसरा पाकिस्तानमध्ये गेला. त्यांनी दोन्ही देशांसह पूर्व पाकिस्तानात (1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती झाली) कारखाना सुरु केला.
ऑनलाइन जेवण मागवताय, थांबा! त्याआधी ही बातमी वाचा...
या दोन्ही भावांचे आज स्वतंत्र व्यवसाय आहेत. पण त्यांचे प्रॉडक्टस जवळपास एक सारखेच आहेत. माजिद यांचे पणतू आणि हमदर्द इंडियाचे सीईओ हमिद अहमद यांनी एनपीआरला दिलेल्या माहितीनुसार त्यांचा वार्षिक व्यापार जवळपास 70 मिलियन डॉलर आहे. 2020 मध्ये कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार फक्त रूह अफजाच्या विक्रीतून त्यांना 37 मिलियन डॉलरपेक्षा जास्त कमाई झाली होती.