
Marathi Surname : नावासोबतच आडनाव ही व्यक्तीची ओळख असते. आडनावावरून व्यक्तीच्या ठिकाणाचाही अंदाज लावला जाऊ शकतो. कोकणावासियांच्या आडनावात शेवटी बऱ्याचदा 'कर' लिहिले जाते. मात्र आडनावाच्या शेवटी येणारे हे 'कर' कुठून आले, असा अनेकांना प्रश्न पडतो. मात्र बारकाईने विचार केला तर समजतं की 'कर' च्या आधी एखाद्या गावाचं नाव असतं. म्हणजेच अशी आडनावे केवळ एक भाषिक पद्धत नसून, त्या व्यक्तीच्या मूळ ठिकाणाचा किंवा गावाचा स्पष्टपणे संदर्भ देणारी एक महत्त्वाची ओळख आहे.
ठिकाणाची माहिती देणारी ओळख
'कर' हा शब्द गावाचं किंवा ठिकाणाचं नाव दर्शवण्यासाठी वापरला जातो. आडनावातील 'कर' हा भाग त्या व्यक्तीच्या गावाशी किंवा परिसराशी संबंधित असतो. ज्यामुळे त्या व्यक्तीची भौगोलिक ओळख लगेच पटते. उदाहरणार्थ, काही आडनावे थेट त्यांच्या जन्मस्थानाशी जोडलेली असतात.
(नक्की वाचा- Paratha vs Poha: पोहे की पराठे? हेल्दी नाश्त्यासाठी तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता?)
ओळख आणि वारसा
आडनावाच्या माध्यमातून व्यक्तीची कौटुंबिक ओळख आणि पूर्वजांचा वारसा जपला जातो. हे केवळ आडनाव नसून, त्या कुटुंबाचा ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भ स्पष्ट करणारा एक महत्त्वाचा भाग असतो.
(नक्की वाचा- Shah Rukh Khan - Alakh Pandey: ट्युशन घेत उभारली 14,510 कोटींची संपत्ती, 'फिजिक्सवाला'ने किंग खानला टाकलं मागे)
आडनावाचा उद्देश
आडनाव वापरण्याचे मुख्य उद्दिष्ट समाजात समान नाव असलेल्या व्यक्तींमध्ये फरक करणे हा आहे. 'कर' जोडून निर्माण झालेले आडनाव व्यक्तीला एक विशिष्ट ओळख देते आणि ती व्यक्ती कोण आहे किंवा कुठून आली आहे, हे समजून घेण्यास मदत करते. थोडक्यात, मराठी आडनावामागील 'कर' हा व्यक्तीच्या मुळ ठिकाणाचा संदर्भ देतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world