
Unseasonal Rain : मागील दोन आठवड्यांपासून मराठवाड्यात सतत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. ज्यात छत्रपपती संभाजीनगरासह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यात गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे मका पिकासह अन्य उन्हाळी पिकांना फटका बसला. तसेच मोसंबी, आंबा यासह अन्य फळबागा देखील बाधित झाल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्राथमिक अहवालानुसार, मराठवाडा विभागातील 17 हेक्टर जिरायत क्षेत्र, 1 हजार 480 हेक्टरवरील बागायत आणि 1 हजार 18 हेक्टरवरील फळपिकांना फटका बसला. एकूण 2 हजार 511 हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले आहेत. तसेच 1 मे ते 12 मे दरम्यान वीज पडून 6 जणांचा आणि झाड पडून एकाचा असे सात जणांचा मृत्यू झाला आहे.
(नक्की वाचा- Cyclone Shakti : बंगालच्या उपसागरात तयार होतंय 'शक्ती चक्रीवादळ', कोणत्या राज्यांना धोका?)
मराठवाड्यात पिके, फळबागांचे नुकसान
- छत्रपती संभाजीनगर - 314 हेक्टर
- जालना- 1 हजार 923 हेक्टर
- परभणी- 27 हेक्टर
- हिंगोली- 29 हेक्टर
- नांदेड - 173 हेक्टर
- बीड - 16.50 हेक्टर
- लातूर - 27.20 हेक्टर
नाशिकमध्येही मोठं नुकसान
नाशिकमध्येही मागील 7 दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. डाळिंब, आंबा, कांदा, भाजीपाला सह इतर पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यासोबतच जिल्ह्यामध्ये 731 घरांची पडझड झाली असून बागलाण तालुक्यात एक गोठा, दोन शाळा तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुकसान झाले.
(नक्की वाचा - Pre Monsoon News : पूर्व मान्सूनला सुरुवात; महाराष्ट्रात यंदा मान्सून लवकर होणार दाखल)
चांदवड तालुक्यात एका पोल्ट्रीची पावसाने पडझड झाली असून, 22 पशुधन मयत झाले आहेत. तर ओझरला आठ मेंढ्या दगावल्या आहेत. या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले असून आधीच मालाला भाव मिळत नसतांना आता या पावसामुळे ऐन काढणीवर आलेला कांदा खराब होतोय. नाशिकच्या मखमलाबाद गावी पावसामुळे कांद्याचे संरक्षण व्हावे यासाठी शेतातच तात्पुरत्या स्वरूपात ताडपत्री पासून शेतकऱ्यांनी शेड उभारले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world