जाहिरात

गर्भवती महिलांना रोज 3 वेळा पतीला मिठी मारण्याचा सल्ला का देतात स्त्रीरोगतज्ज्ञ? जाणून घ्या त्या मागचे कारण

डॉ. धनु यांनी सांगितले की, "सुरुवातीच्या तीन महिन्यांत महिलांनी रेडिएशनच्या संपर्कात येण्यापासून वाचले पाहिजे.

गर्भवती महिलांना रोज 3 वेळा पतीला मिठी मारण्याचा सल्ला का देतात स्त्रीरोगतज्ज्ञ? जाणून घ्या त्या मागचे कारण

गरोदरपण हा कोणत्याही महिलेसाठी खूप खास काळ असतो. पण त्यासोबतच अनेक प्रश्न, चिंता, आनंद, आशा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जबाबदारीची भावना असते. आई होण्याची भावना खरोखरच जगातील सर्वात सुंदर भावनांपैकी एक आहे. पण या 9 महिन्यांचा काळ अनेकदा एका महिलेसाठी गोंधळात टाकणारा, गुंतागुंतीचा आणि कधीकधी एकटेपणाचा असू शकतो. म्हणूनच, आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत ज्या तुमच्या गर्भवती पणाच्या प्रवासात मदत करू शकतात.नुकतेच, अभिनेत्री सोहा अली खानच्या पोडकास्टमध्ये मुंबईतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रंजना धनु यांनी गरोदरपणाशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांनी हे देखील सांगितले की, त्या आपल्या प्रत्येक रुग्णाला दिवसातून 3 वेळा पतीला मिठी मारणे आवश्यक असल्याचा सल्ला देतात. चला तर, गरोदरपणाच्या प्रवासाविषयी त्यांचे काय म्हणणे आहे आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, ते जाणून घेऊया.

गरोदरपणाची सुरूवात आणि तीन महिने
डॉ. धनु यांनी सांगितले की, "गर्भधारणा शेवटच्या मासिक पाळीच्या 11व्या ते 17व्या दिवसादरम्यान होते.  जेव्हा एखाद्या महिलेला ती गर्भवती असल्याचे समजते. तेव्हापर्यंत 5 आठवडे उलटून गेलेले असतात. त्यामुळे, तुम्ही आई होण्याची योजना करत असाल किंवा नसाल, तरीही या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे." त्या म्हणाल्या की, "सुरुवातीच्या तीन महिन्यांत बाळाचे सर्व अवयव तयार होण्यास सुरुवात होते. त्यामुळे गर्भवती महिलांनी खूप काळजी घेणे आवश्यक आहे. अशा वेळी तुम्ही कोणत्याही डॉक्टरांकडे जात असाल आणि कोणतेही औषध घेत असाल, तर त्याचा बाळावर आयुष्यभर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, तुम्ही लगेच स्त्रीरोगतज्ज्ञांना भेटणे खूप महत्त्वाचे आहे. कारण एका स्त्रीरोगतज्ज्ञांना हे कळत नाही की रुग्णाने या काळात कोणती औषधे घेतली आहेत.

रेडिएशन आणि महत्त्वाचे स्कॅन
डॉ. धनु यांनी सांगितले की, "सुरुवातीच्या तीन महिन्यांत महिलांनी रेडिएशनच्या संपर्कात येण्यापासून वाचले पाहिजे. कारण त्याचा बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या आणि रोज स्कॅनरमधून जाणाऱ्या किंवा विमानतळावर काम करणाऱ्या महिलांनी या काळात सावध राहावे. 12व्या आठवड्यापर्यंत काही प्रमाणात अवयव विकसित होतात. पण 24व्या आठवड्यापर्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. या काळात महिलांनी शरिर संबंधापासून  दूर राहिले पाहिजे असा सल्ला ही त्या देतात.  

नक्की वाचा - Joint Pain Remedy: सांध्यांमधील वेदना खेचून बाहेर काढतील हे उपाय, फॉलो करा हंसा योगेंद्र यांनी सांगितलेले उपाय

कोणते स्कॅन करणे आवश्यक

याबद्दल डॉ. धनु यांनी सांगितले की, "5 आठवड्यांनंतर सोनोग्राफी करावी. कारण काही महिलांना ट्युबल प्रेग्नन्सी (tubal pregnancy) असते. त्यात अंडं गर्भाशयात येत नाही. आणि 6 ते 7 आठवड्यांत ती ट्युब फाटू शकते. त्यामुळे 5 आठवड्यांनंतर हे स्कॅन करणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या रुग्णांचा आधी गर्भपात झाला आहे, ते 8व्या आठवड्यात स्कॅन करतात. जेणेकरून बाळ ठीक आहे की नाही हे कळते. त्यानंतर 11व्या किंवा 12व्या आठवड्यात एक स्कॅन केला जातो. ज्यासोबत एक ब्लड मार्करही असतो. जो बाळ अपूर्ण वाढले आहे की नाही हे सांगतो. त्यानंतर 16व्या आठवड्यात आणि 19व्या किंवा 20व्या आठवड्यात एनॉमली स्कॅन केला जातो. जो खूप महत्त्वाचा आहे. यात बाळाचे सर्व अवयव योग्यरित्या विकसित झाले आहेत की नाही, हे कळते. त्यानंतर 28व्या आणि 32व्या आठवड्यात स्कॅन केला जातो, ज्यामुळे बाळ योग्यरित्या वाढत आहे की नाही हे समजते."

जोडप्यांसाठी सल्ला
डॉ. धनु यांनी सांगितले की, "मी माझ्या रुग्णांना सल्ला देते की पती आणि पत्नीने एकमेकांना स्पर्श करून बोलावे किंवा रोज तोंडी संवाद साधावा आणि दररोज 3 वेळा पती-पत्नीने एकमेकांना मिठी मारावी. आजच्या काळात तणावाशी संबंधित अनेक समस्या आहेत. जेव्हा पती-पत्नी रोज एकमेकांना मिठी मारतात, तेव्हा बाळालाही त्याच्या वडिलांच्या उर्जेची जाणीव होते आणि वडिलांनाही बाळाशी जोडल्याची भावना येते." डॉ. धनु म्हणाल्या, "12व्या आठवड्यानंतर मी माझ्या रुग्णांना त्वचेची खूप काळजी घेण्याचा सल्ला देते. मी त्यांना स्ट्रेच मार्क क्रीम वापरण्यास सुरुवात करायला सांगते आणि आंघोळ करताना जास्त मॉइश्चर असलेले साबण वापरण्यास सांगते. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिकात दिवसातून दोन-तीन वेळा स्ट्रेच मार्क क्रीम वापरावे. यामुळे गरोदरपणानंतर स्ट्रेच मार्क्स येत नाहीत.

 Joint Pain Treatment: 2 थेंब लावा हे तेल, सांधेदुखी पटकन होईल गायब)

डॉ. धनु यांनी सांगितले, "गरोदरपणाच्या सुरुवातीला किंवा एखादी महिला गरोदर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्यांना फॉलिक ऍसिड आणि बी कॉम्प्लेक्स घेण्याचा सल्ला देतो. त्यांच्यात हार्मोनची कमतरता असल्यास, आम्ही त्यांना हार्मोन सप्लिमेंट्सही देतो. दुसरे त्रैमासिक सुरू झाल्यावर त्यांना लोह, कॅल्शियम, झिंक, ओमेगा इत्यादींचा सल्ला दिला जातो. "हा सल्ला केवळ सामान्य माहिती प्रदान करतो. ही कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी, नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. NDTV या माहितीची जबाबदारी घेत नाही.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com