Why do we say 'Merry Christmas' not 'Happy Christmas': Christmas 2025: ख्रिसमसच्या दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. चर्चमध्ये प्रार्थना, घरात ख्रिसमस ट्रीची सजावट आणि केकचा सुवास अशा वातावरणात आपण एकमेकांना 'मेरी ख्रिसमस' म्हणतो. 'मेरी' (Merry) आणि 'हॅप्पी' (Happy) या दोन्ही शब्दांचा अर्थ 'आनंद' असाच होतो, तरीही ख्रिसमससाठी 'मेरी' शब्दच जास्त रूढ झाला आहे.
'Merry' आणि 'Happy' मधील फरक
इंग्रजी भाषेत दोन्ही शब्दांचे अर्थ सुखद असले तरी त्यांच्या भावनेत फरक आहे. Merry या शब्दाचा अर्थ उत्साही, आनंदाने भरलेला आणि जोरात जल्लोष करणारा असा आहे. यात नाच-गाणे, संगीत आणि सर्वांनी एकत्र येऊन धिंगाणा घालत साजरा केलेला आनंद अभिप्रेत असतो. Happy हा शब्द तुलनेने शांत, वैयक्तिक आणि मानसिक समाधानाला दर्शवतो.
(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)
'Merry Christmas' ची सुरुवात कशी झाली?
या शब्दाचा वापर अनेक शतकांपासून होत आहे. 1534 मध्ये बिशप जॉन फिशर यांनी एका पत्रात पहिल्यांदा 'Merry Christmas' असा उल्लेख केला होता. 1843 मध्ये प्रसिद्ध लेखक चार्ल्स डिकन्स यांचे 'A Christmas Carol' हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकात त्यांनी 'Merry Christmas' शब्दाचा इतक्या वेळा वापर केला की तो लोकांच्या तोंडी बसला. त्याच काळात पहिल्यांदा व्यावसायिक ख्रिसमस कार्ड्स तयार करण्यात आले, ज्यावर 'Merry Christmas' छापले गेले होते.
'Happy Christmas' कुठे बोलले जाते?
असे नाही की 'Happy Christmas' अजिबात वापरले जात नाही. आजही ब्रिटनमध्ये अनेक लोक 'Happy Christmas' म्हणणे पसंत करतात. दिवंगत राणी एलिझाबेथ द्वितीय त्यांच्या संदेशात नेहमी 'Happy Christmas' म्हणत असत. त्यांच्या मते 'Merry' हा शब्द जास्त गोंगाट आणि मस्तीशी संबंधित होता. तर 'Happy' हा शब्द अधिक सभ्य आणि शालीन वाटायचा.
थोडक्यात सांगायचे तर, अमेरिकेत आणि भारतासह इतर देशांत 'Merry Christmas' जास्त लोकप्रिय आहे, तर ब्रिटनमध्ये आजही 'Happy Christmas' ऐकायला मिळते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world