
Prabhadevi Flyover : शिवडी-वरळी उन्नत मार्गासाठी 125 वर्षे जुना प्रभादेवी उड्डाणपूल एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. हा मार्ग पुढील वर्षभरासाठी बंद राहील. त्यामुळे वर्षभरासाठी येथील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. यामुळे मात्र प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अटल सेतुवरून येणाऱ्या वाहनांना जलद गतीने वरळीपर्यंत पोहोचविण्यासाठी 4.5 किमी लांब शिवडी-वरळी कनेक्टरचं बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासनाने अटल सेतू, वरळी-वांद्रे सी लिंक आणि कोस्टल रोडला एकमेकांशी जोडण्याचा प्लान तयार केला आहे. शिवडी-वरळी हा नवा उन्नत मार्ग प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या प्रभादेवी उड्डाणपूल येथून जाईल. मात्र प्रभादेवी उड्डाणपूल जुना झाल्याने नवा पुलाच्या बांधकामासाठी एमएमआरडीएने हा पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय किंवा डबल डेकर पूल बांधून उन्नत रस्ता पुढे नेण्याचा निर्णय घेतला. याबाबत वाहतूक पोलिसांकडून एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातील ना हरकत प्रमाणपत्र येईल अशी शक्यता आहे. त्यानंतर प्रभादेवी उड्डाणपूल बंद करून पाडकाम सुरू होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Mumbai News: मुंबईत बेशिस्त वाहनचालकांची संख्या वाढली! 13 महिन्यात तब्बल 'इतक्या' कोटींचा दंड वसूल
पुलाच्या पाडकामामुळे दररोज मेगाब्लॉक
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पुलाचं पाडकाम सुरू झाल्यानंतर नवीन पुलाच्या उभारणीच्या कामासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर काही तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक कोणत्या वेळेत आणि किती तासांचा असेल हे लवकरच स्पष्ट होईल. प्रभादेवी उड्डाणपूल बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी पर्याय मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दक्षिणेकडे करी रोड पूल आणि उत्तरेकडे टिळक पुलावरून पर्यायी मार्ग असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world