शरद सातपुते, सांगली
सांगलीतील आटपाडी तालुक्यातील काही नागरिकांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट मिळालं आहे. आटपाडी तालुक्यातील अंबाबाई मंदिर परिसरातील सुख ओढ्याजवळ आज मोठी गर्दी उमटली होती. या ओढ्यात लाखो रुपये मिळत असल्याने लोकांनी पैसे गोळा करण्यासाठी येथे गर्दी केली होती. सुख ओढ्यात वाहून येणाऱ्या नोटा कुठून येत होत्या, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.
(नक्की वाचा- Supreme Court : बांग्लादेशातून आसाममधील स्थलांतरितांबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
आटपाडीतील अंबाबाई मंदिराजवळ सकाळी 8.30 च्या सुमारास काही विद्यार्थी जात असताना सुख ओड्यात काही नोटा दिसून आल्या. त्या विद्यार्थ्यांनी नोटा बघितल्यानंतर ओढ्यात नोटा सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी वेगाने पसरली. आज आटपाडीचा आठवडा बाजार असतो. त्यामुळे लोकांची एकच झुंबड उडाली.
लोकांना ओढ्यात उतरून नोटा गोळा केल्या. काही लोकांना 50 हजार, काही लोकांना 30 हजार, काही लोकांना 10 हजार तर काही लोकांना लाखो रुपये या ओढ्यातून मिळाले आहेत.
(नक्की वाचा- यमुना नदीत फेसाचा जाड स्तर, पाणी झालंय विषारी; CPCB ने सांगितलं कारण)
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस पोहचले. पोलीस तपास करत आहेत की या नोटा कुणाच्या असून या ओढ्यात कुठून आल्या. ऐन दिवाळीच्या आधी अशा प्रकारे धनलाभ झाल्याने ज्यांना लाभ झाले ते सुखावले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world