
योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : ‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024' मध्ये महाराष्ट्राला ‘अ' श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना (Cotton production) राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय. कापूस प्रक्रिया उद्योगासाठी अकोल्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाला आहे. पाहू या अकोल्यातील ' पांढऱ्या सोन्याची ' ही खास बातमी...
‘एक जिल्हा एक उत्पादन 2024' अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्याला ' अ ' श्रेणीतील सुवर्णपदकं प्राप्त झाले आहेक. अकोला जिल्ह्याला कापूस प्रक्रिया उद्योग विकासासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि अकृषी क्षेत्रातील आपल्या विशेष उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार पटकावले आहेत.
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राने आपल्या उत्पादनांच्या नाविन्यपूर्णतेने, उच्च दर्जाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रोसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे. अकोल्यात सुमारे 100 जीनिंग आणि प्रेसिंग असून 4 सूतगिरण्या आहेत. कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार अकोल्याला मिळाला आहे.
नक्की वाचा - Assembly Session : शेतकऱ्यांची सावकारांच्या जाचातून होणार सुटका, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
या पुरस्कारासाठी देशभरातील 577 जिल्ह्यांनी नामांकन भरलं होतं. मात्र अकृषी क्षेत्रात पुरस्कार मिळवणारा अकोला हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेत सामूहिक सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आणि याद्वारे पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात कापूस प्रक्रिया उद्योगांना भांडवल मिळवून देण्यात आले. यामुळे बोरगाव मंजू परिसरात ‘संघा क्लस्टर' निर्माण झाले असून त्याचे 103 सदस्य आहेत. अकोल्याला मिळालेल्या या बहुमानामुळे कापूस ते कपडा निर्मितीपर्यंतचा उद्योग करणाऱ्या या एकमेव उद्योगाला भविष्यात निर्यातीच्या संधी सुद्धा उपलब्ध होणार आहे.
केंद्र शासनातर्फे अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्यामुळे येथील कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहे. याचा येथील शेतकऱ्यांना आणि स्थानिक उद्योजकांना निश्चितच लाभ होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world