जाहिरात

Good News : राज्यात 81 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, 20 हजार जणांना मिळणार रोजगार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत 81 हजार 137 कोटी रूपयांच्या सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.

Good News : राज्यात 81 हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, 20 हजार जणांना मिळणार रोजगार
मुंबई:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत 81 हजार 137 कोटी रूपयांच्या सात प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.  उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा यामध्य़े समावेश आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असून त्यामुळे राज्यात सुमारे 20 हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीत  उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम आयन सेल/बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप्स, सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझर, फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.

कोणत्या प्रकल्पांना मंजुरी?

जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन लि., यांचा लिथियम बॅटरी निर्मितीच्या प्रकल्पासाठी गुंतवणुक होणार आहे. हा प्रकल्प नागपूर भागात होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण 25 हजार कोटी एवढी गुंतवणूक होणार आहे. 5000 पेक्षा जास्त रोजगारनिर्मिती होणार आहे. 

जेएसडब्ल्यु ग्रीन मोबिलीटी लि. कंपनी इलेक्ट्रीक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा प्रकल्प प्रकल्प छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 27 हजार 200 कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, 5200 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामध्ये वार्षिक 5 लाख इलेक्ट्रीक प्रवासी कार आणि 1 लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन आहे.

हिंदूस्थान कोका कोला बेव्हरेज मार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा प्रकल्प रत्नागिरीमध्ये होणार आहे. या प्रकल्पात 1500 कोटी गुंतवणूक होणार आहे.

( नक्की वाचा : मराठवाड्यातील 55 हजार हेक्टर खालसा जमिनी खुल्या होणार, कुणाला होणार फायदा? )
 

आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमीकंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प तळोजा/पनवेल, जि. रायगड/पुणे/उर्वरीत महाराष्ट्रामध्ये उभारण्यात येणार आहे.  राज्यातला हा पहिलाच सेमीकंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प आहे.  याप्रकल्पामध्ये पहिल्या टप्यात 12 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 4000 पेक्षा अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. दुसऱ्या टप्यामध्ये एवढीच गुंतवणूक होणार आहे. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्वावर सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू होणार असल्याची माहिती आहे.

आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प अतिरिक्त एमआयडीसी, बुटीबोरी जि. नागपूर आणि एमआयडीसी भोकरपाडा, ता. पनवेल जि. रायगड या परिसरात उभारण्यात येणार आहे. कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित राज्यात प्रकल्प स्थापित होणार आहे. प्रकल्पामध्ये एकूण 13 हजार 657 कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, याद्वारे 8000 पेक्षा अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा.लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर येथे स्थापन करण्याचे नियोजित आहे. प्रकल्पामध्ये 1787 कोटी रपयांची गुंतवणूक होणार आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com