जाहिरात

Adani Power Acquisition : अदाणी पॉवरकडून विदर्भ पॉवरचे अधिग्रहण पूर्ण, उत्पादन क्षमतेत 18,150  मेगावॅटपर्यंत वाढ

अदाणी पॉवर लिमिटेड (एपीएल) ने 600 मेगावॅट विदर्भ वीज प्रकल्पाचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. कंपनीने हा करार एकूण 4,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला आहे.

Adani Power Acquisition : अदाणी पॉवरकडून विदर्भ पॉवरचे अधिग्रहण पूर्ण, उत्पादन क्षमतेत 18,150  मेगावॅटपर्यंत वाढ

अदाणी पॉवर लिमिटेड (एपीएल) ने 600 मेगावॅट विदर्भ वीज प्रकल्पाचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. कंपनीने हा करार एकूण 4,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण केला आहे. हा महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी भागात 2x300 मेगावॅट कोळशावर आधारित वीज प्रकल्प आहे.

आता अदाणी पॉवरची एकूण उत्पादन क्षमता 18,150 मेगावॅट..

या करारासह अदाणी पॉवरची एकूण ऑपरेशनल क्षमता वाढून 18,150 मेगावॅट झाली आहे. ही कंपनी देशातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक वीज उत्पादक कंपनी आहे आणि ती तिच्या प्रकल्प पोर्टफोलिओचा सातत्याने विस्तार करत आहे.

2030 पर्यंत 30,670 मेगावॅट क्षमतेचं लक्ष...

कंपनीने स्पष्ट केलं की, त्याचं लक्ष्य वित्त वर्ष 2029-30 पर्यंत 30,670 मेगावॅट उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचवणं आहे. याचसाठी ते अनेक ठिकाणी बांधकाम करीत आहे. अदाणी पॉवर सध्या सहा ब्राऊनफील्ज अल्ट्रा सुपरक्रिटिकल पॉवर प्लांट तयार करीत आहेत. याची क्षमता 1,600 मेगावॅट प्रति प्लांट आहे. या प्लांटची सिंगरौली-महान (मध्यप्रदेश), रायपूर, रायगढ, कोरबा (छत्तीसगड), कोरबा (छत्तीसगड) आणि कवाई (राजस्थान) येथे निर्मिती केली जात आहे. 

अदाणी ग्रीनची क्षमता 15,500 मेगावॅटच्या पार; गौतम अदाणी म्हणाले, 'भारताच्या हरित क्रांतीतील हे सर्वात मोठं यश!' 

नक्की वाचा - अदाणी ग्रीनची क्षमता 15,500 मेगावॅटच्या पार; गौतम अदाणी म्हणाले, 'भारताच्या हरित क्रांतीतील हे सर्वात मोठं यश!' 

याशिवाय, मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथे 1,600 मेगावॅट क्षमतेचा एक नवीन ग्रीनफील्ड प्लांट देखील बांधला जात आहे. तसेच, कोरबा येथे 1,320 मेगावॅट क्षमतेचा जुना सुपरक्रिटिकल प्लांट देखील पुन्हा सुरू केला जात आहे.

एनसीएलटीकडून मिळाली परवानगी...

विदर्भ पॉवर लिमिटेड (VIPL) वर आधीच कर्ज होते आणि दिवाळखोरी प्रक्रिया (CIRP) अंतर्गत केस सुरू होती. 18 जून 2025 रोजी मुंबई NCLT खंडपीठाने अदाणी पॉवरच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी दिली. त्यानंतर, 7 जुलै 2025 रोजी ही योजना यशस्वीरित्या अंमलात आणण्यात आली.

अदाणी पॉवरचे सीईओ एसबी ख्यालिया यांनी सांगितलं की, VIPL चं अधिग्रहण कंपनीच्या रणनितीचा महत्त्वाचा भाग आहे.  भविष्यातही अशा मालमत्तांचे उपयुक्ततेत रूपांतर करण्यासाठी आम्ही काम करत राहू. देशाला विश्वासार्ह आणि परवडणारी वीज पुरवण्यावर आमचं लक्ष आहे, ज्यामुळे देशाच्या विकास प्रवासाला बळकटी मिळेल."

अदाणी पॉवर लिमिटेड देशातील सर्वात मोठी खासगी थर्मल पॉवर प्रोड्यूसर कंपनी आहे. याचे वीज प्रकल्प गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड आणि तमिळनाडूमध्ये पसरले आहेत. याशिवाय कंपनी गुजरातमध्ये 40 मेगावॅटची एक सोलर प्लांटही ऑपरेट करीत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com