जाहिरात

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश

Ahmednagar Railway Station Name Changed:  गेली अनेक वर्षे अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशी मागणी अनेक संघटना आणि नागरिकांकडून होत होती.

Ahmednagar Railway Station: अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश

Ahmednagar Railway Station Name Changed: अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलल्यानंतर आता अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव देखील बदलण्यात आले आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाने परिपत्रक काढून अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘अहिल्यानगर रेल्वे स्थानक' असे केल्याची घोषणा केली आहे. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती आणि या निर्णयामुळे या मागणीला अंशतः यश मिळाले आहे.

गेली अनेक वर्षे अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशी मागणी अनेक संघटना आणि नागरिकांकडून होत होती. आता शासनाच्या गृह मंत्रालयाच्या विभागाने अधिसूचना आणि परिपत्रक काढून रेल्वे स्थानकाचे नाव बदलत असल्याचे स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे स्थानिक नागरिक आणि नाव बदलण्याची मागणी करणाऱ्या संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अहमदनगर शहराचा ऐतिहासिक संदर्भ विचारात घेता, या शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर ठेवण्याची मागणी जोर धरत होती. रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याने या मागणीला सुरुवात झाली असून, लवकरच शहराचे नावही बदलले जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com