जाहिरात

अजित पवारांच्या विमान अपघातामागील सत्य काय? पवार कुटुंबातील व्यक्ती करणार मोठा खुलासा, 10 फेब्रुवारीला...

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडूनही अजित पवारांच्या अपघाताबाबत सवाल उपस्थित केले जात आहे.

अजित पवारांच्या विमान अपघातामागील सत्य काय? पवार कुटुंबातील व्यक्ती करणार मोठा खुलासा, 10 फेब्रुवारीला...

Ajit Pawar Death Rohit Pawar Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतरही त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून अजित पवारांच्या अपघाताबाबत सवाल उपस्थित केले जात आहे. अजित पवारांच्या पायलटला  हिप्नोटाइज केल होते का? त्याला आमिष दाखवलं होत कां? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान पवार कुटुंबातील एक व्यक्ती अजित पवारांच्या अपघाताबाबत मोठा खुलासा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी १० फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेणार असल्याचीही माहिती आहे. 

कोण करणार खुलासा? 

अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार १० फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याची माहिती आहे, ते  म्हणाले की, हा मृत्यू नैसर्गिक नव्हता. असे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरीत आहेत. त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. ते १० फेब्रुवारी रोजी या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतील.

नक्की वाचा - NCP News: 'दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात, बोलणं झालं होतं...' अजित पवारांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा


अनेक सवाल आणि संशय...

रोहित पवार म्हणाले, अजित दादांना संपूर्ण कुटुंब एकत्र हवे होते. ते नेहमीच पक्ष कार्यकर्त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देत असत. त्यांना समान विचारसरणीच्या लोकांना निवडून द्यायचे होते. दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असतानाच ही दुःखद दुर्घटना घडली. यामुळे सर्वांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका निर्माण झाल्या आहेत. मी १० फेब्रुवारी रोजी मुंबईत या विषयावर एक प्रेझेंटेशन देईन, ज्यामध्ये हा अपघात का आणि कसा झाला असेल हे स्पष्ट केले जाईल.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com