जाहिरात

Jay Pawar Marriage :वऱ्हाड निघालं बहरिनला! अजित पवारांच्या चिरंजीवाचा लग्नसोहळा, लग्नपत्रिकेत ड्रेस कोडही नमूद

४ ते ७ डिसेंबर या चार दिवसांच्या लग्नसोहळ्याची लग्नपत्रिका समोर आली आहे. यामध्ये दिवसागणिक कार्यक्रम, पोशाख आणि पोशाखाचा रंग आदी माहिती देण्यात आली आहे. 

Jay Pawar Marriage :वऱ्हाड निघालं बहरिनला! अजित पवारांच्या चिरंजीवाचा लग्नसोहळा, लग्नपत्रिकेत ड्रेस कोडही नमूद

Rutuja Patil Jay Pawar Marriage : सध्या देशभरात लग्नाची धामधूम सुरू आहे. अगदी सर्वसामान्य, मराठी सिनेक्षेत्र, बॉलिवूड, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून राजकारणातही धुमधडाक्यात लग्नसोहळे आयोजित केले जात आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय नेत्याच्या घरातून ढोलताशांचा आवाज ऐकू येणार आहे. निवडणूक धामधूम संपताच उपमुख्यमंत्री अजित पवार धाकटे चिरंजीव यांच्या लग्नासाठी परदेश दौरावर जाणार आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील 5 डिसेंबर २०२५ रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नासाठी अजित पवार पुढील काही दिवस कुटुंबासोबत असणार आहे. 

बारामती नाही तर बहरिनला लग्न... (Rutuja Patil Jay Pawar Marriage in Bahrain)

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा ४, ५, ६ आणि ७ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये पार पडणार आहे. पवार आणि पाटील कुटुंबाकडून लग्नासाठी ४०० निमंत्रित उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केवळ पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.  दरम्यान जय पवार यांची लग्नपत्रिका समोर आली आहे. या पत्रिकेत सर्व कार्यक्रमांची सविस्तर यादी देण्यात आली आहे. कोणत्या दिवशी कशा प्रकारचा पोशाख असावा याचाही उल्लेख लग्नपत्रिकेत करण्यात आला आहे. 

नक्की वाचा - Who is Rutuja Patil: अजित पवारांचे चिरंजीव लग्नबंधनात अडकणार! कोण आहेत दादांच्या होणाऱ्या सूनबाई 'ऋतुजा पाटील'?

खास लग्नपत्रिका चर्चेत...

४ ते ७ डिसेंबर या चार दिवसांच्या कार्यक्रमाची लग्नपत्रिका समोर आली आहे. यामध्ये दिवसागणिक कार्यक्रम, पोशाख आणि पोशाखाचा रंग आदी माहिती देण्यात आली आहे. 

४ डिसेंबर - वेलकम लंच

पोशाख - Casual 

सायंकाळी ५ नंतर - मेंदीचा कार्यक्रम
पोशाख - Indian Jewel Tones 

Latest and Breaking News on NDTV

५ डिसेंबर - हळदीचा कार्यक्रम

सकाळी १०.३० - हळद
पोशाख - पिवळा रंग

दुपारी ३.३० नंतर पुढे

वरात निघणार...

सायंकाळी ५.३० पुढे..

लग्नसोहळा 

पोशाख - भारतीय परंपरा

६ डिसेंबर 

दुपारी १२ नंतर - Beach Olympics 

पोशाख - Monochrome in white, resort wear

सायंकाळी ७.३० पुढे..

संगीत 

पोशाख - Glitz and Glam

कोण आहे ऋतुजा पाटील?

खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी पवार फॅमिलीच्या भावी सूनबाई ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण या केसरी ट्रॅव्हल्सचे केसरी पाटील यांच्या घरच्या सूनबाई आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com