
Jay Pawar Wedding : अजित पवार यांच्या दुसरा मुलगा जय यांचा विवाह निश्चित झाल्याचे संकेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयात फूट पडली होती. बारामती लोकसभा निवडणुकीत जय पवार यांनी आत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे जय पवार चर्चेत आले होते. या फोटोमध्ये शरद पवार आणि अ प्रतिभा पवार यांच्या समवेत पवार कुटुंबीय तसंच जय पवार यांच्या संभाव्य पत्नी देखील दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे तसंच अन्य कुटुंबीय दिसत आहेत. जय पवार आणि त्यांची संभाव्य पत्नी ऋतुजा देखील या फोटोमध्ये दिसत आहेत. 'जय आणि ऋतुजा यांचं अभिनंदन. खूप आनंद झाला. आनंदी राहा आणि सुखी रहा',असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलंय.
कोण आहेत जय पवार?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव पार्थ पवार असून ते राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यामध्ये पार्थ पराभूत झाले होते. जय पवार हे अजित पवारांचे लहान चिरंजीव आहे.
मोठा भाऊ पार्थ पवार राजकारणात सक्रीय असताना जय हे राजकारणापासून बराच काळ दूर होते. 'द प्रिंट' यांनी दिलेल्या वृत्तानुसार जय पवार यांनी दुबईमध्ये पवार कुटुंबीयांच्या व्यवसायाची धूरा सांभाळली होती.
( नक्की वाचा : 'सुनेत्रा पवारांना बहिणीविरुद्ध उभं केलं ही चूक', अजित पवारांची मोठी कबुली )
गेल्या काही वर्षांपासून जय पवार यांनी बारामतीच्या स्थानिक राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यांचा बारामतीमध्ये जनसंपर्क वाढवला आहे. लोकसभा निवडणुकीत आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात ही जय पवार सक्रीय होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world