जाहिरात

Dhananjay Munde : धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ? सुरेश धस ईडीकडे करणार तक्रार, काय आहे प्रकरण?

Dhananjay Munde News : तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची 200 कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा धस यांचा दावा आहे. 

Dhananjay Munde : धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ? सुरेश धस ईडीकडे करणार तक्रार, काय आहे प्रकरण?

Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्याने होत असलेल्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र राजीना दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. धनंजय मुंडे यांच्या मागे आता ईडी चौकशीचा फेरा लागण्याची शक्यता आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कृषी विभागातील या घोटाळ्याची ईडीकडे भाजप आमदार सुरेश धस ईडीला पत्र लिहून तक्रार करणार आहे. तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची 200 कोटींची रक्कम परस्पर उचलल्याचा धस यांचा दावा आहे. 

(नक्की वाचा- कशाला एवढं ताणता, जीवावर उठता का? तो फोन... आपल्यासोबत बरंवाईट होणार हे देशमुखांना कळलं होतं?)

अंजली दमानिया यांचाही आरोप

 सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर कृषीमंत्री असताना जवळपास 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी सरकारने योजना सुरू केली होती. या योजनेतील नियमांना धाब्यावर बसवून धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. या योजनेअंतर्गत कापूस गोळा करण्याच्या बॅग, नॅनो युरिया, नॅनो डीओबी, फवारणी पंप अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली. मात्र या वस्तूंची खरेदी बाजारभावापेक्षा महाग करण्यात आली. यामुळे कमी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता आहे. 

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: 'बोल सुदर्शन घुले बाप..., 'त्या' 15 व्हिडिओंची A to Z स्टोरी; वाचून काळजाचा थरकाप उडेल)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: