शुभम बायस्कार, प्रतिनिधी
Amravati accident News : दोन कार एकमेकांसमोर धडकल्यानं झालेल्या अपघातामध्ये तीन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अकोला मार्गावर हा अपघात झाला. या अपघातामधील जखमींना अकोलामध्ये पाठवण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आनंद बाहकर ( 26), बंटी बिजवे (38), प्रतीक बोचे (35) अशी मृतांची नावे आहेत. तर या कारमधील चौथा व्यक्ती पप्पू घाणीवाले जखमी झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील आकाश अग्रवाल, रमेश अग्रवाल जखमी झाले आहेत.
( नक्की वाचा : 2025 मध्ये मुंबई-नागपूर प्रवास अवघ्या 8 तासात, शेवटच्या टप्प्याचं 100 टक्के काम पूर्ण )
प्रतीक, आनंद, बंटी आणि पप्पू हे MH 27 डीइ 6260 या क्रमांकाच्या कारने अकोलाकडे जात होते. त्यांच्या दिशेने आकाश अग्रवाल यांची कार क्रमांक MH 29 बीसी 7786 येत होती. अचानक कारवरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही कार समोरासमोर धडकल्या. हा अपघात एवढा भीषण होता की, प्रतीक बोचे आणि बंटी बिजवे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, आनंद बहकार याला दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. या अपघातातमध्ये जखमी झालेल्या अग्रवाल पिता पुत्रांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world